Onion Crops In Crises  esakal
मराठवाडा

अवकाळी पाऊस उठला शेतकऱ्यांच्या जीवावर, गव्हाला लागली खोडकीड

खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा व कांदा लागवड केली. मात्र पावसाने याही पिकांना सोडले नाही.

जलील पठाण.

औसा (जि.लातूर) : गेल्या काही महिन्यांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांची पार वाट लावली आहे. या पाऊस व पडत आलेल्या धुक्याने तुरीचा खराटा झाला असून हरभरा व तूर मर रोगाने गिळंकृत केल्याचे चित्र आहे. याच वातावरणाने कांदा पिकाला पार करपवून टाकले (Rain Damage Crops) आहे. तर गव्हाला खोडकीड लागली आहे. त्यावर तांबेरा पडत असल्याने खरिपातील सोयाबीनचे वाटोळे केलेला पाऊस आता शेतकऱ्यांची रब्बीही नष्ट करीत आहे. निसर्गाच्या या दणक्याने शेतकरी उद्धवस्त होण्याच्या मार्गावर असून हजारो हेक्टरवर पेरलेल्या हरभऱ्यावर (Latur) आता नांगर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. लातूर जिल्ह्यात खरिपात सोयाबीन, तूर आणि रब्बीत हरभरा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. हरभरा आणि सोया हे दोन्ही हंगामातील मुख्य आणि भरघोस उत्पादन देणारी पिके शेतकऱ्यांचा आर्थिक आधार आहेत. मात्र यंदा सोयाबीनच्या काढणीपासूनच पावसाने थैमान घातले. (Rain In Latur)

यामध्ये शेकडो हेक्टरवरील सोयाबीन वाहून गेले, तर काही पाण्यात कुजून नष्ट झाले. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा व कांदा लागवड केली. मात्र पावसाने याही पिकांना सोडले नाही. फुलोरा व शेंगांच्या अवस्थेत तूर ओंबळू लागली तर रोजच पडणाऱ्या धुक्याने तुरीचा पार खराटा झाला. हिच अवस्था कांदा पिकाची झाली. हिरवागार असलेला कांद्याचा फड एका रात्रीत जळून खाक होऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी महागड्या फवारण्या वरून कराव्या लागल्या तरीही कांद्याने दगाच दिला. उरला सुरला हरभरा आता मरु लागला आहे. पाणी जास्त झाल्याने त्याच्या मुळाला बुरशी लागली असल्याने हजरो हेक्टरवरील हरभरा जाग्यावर वाळून जात आहे. दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा दुसऱ्यांदा बुरशीच्या कचाट्यात सापडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप गेले, रब्बीही निसर्ग येऊ देत नाही आता करावे तरी काय? ही धास्ती शेतकऱ्यांना झोप येऊ देत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT