Aurangabad news  
मराठवाडा

Valentines Day : SEX बद्दल स्वतःहून बोलत नाहीत महिला, पण... 

सकाळ डिजिटल टीम

सेक्स हा विषय निघाला, की आपण तोंड फिरवून घेतो. सुसंस्कृत भारतीय महिला तर हा विषयही तोंडावाटे काढत नाहीत. यावर खुल्या चर्चा होणे तर दूरच आहे. त्यांच्या लैंगिक इच्छांबाबतही खुलेपणानं कुणी बोलतामना दिसत नाही. आपला समाज अजूनही त्याबद्दल काहीसा मागास असल्याचं समाजशास्त्रज्ञांचं मत आहे. 

एका विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, महिलांमध्ये १८ ते २४ वयोगटात लैंगिक इच्छा फार प्रबळ असते. विशीतला सेक्स हा परिपूर्ण आनंद देणारा असतो, असं काही जाणकार महिला सांगतात. 

मुलीच्या विवाहासाठी स्थळ पाहताना उपवर मुलाची सांपत्तिक, कौटुंबिक स्थिती पाहिली जाते. त्याचं पॅकेज हा कळीचा मुद्दा ठरतो. पण त्याची लैंगिक क्षमता आणि त्या विषयाची जाण याबद्दल कुणी काही बोलत नाही. त्यामुळे अशी लग्ने पुष्कळदा महिलांना लैंगिक सौख्य देऊ शकत नाहीत. अशा महिलांची संख्या मोठी आहे. 

मुली अनेकदा आपल्या मैत्रिणींशी यावर मोकळेपणाने बोलतात. पण आपल्या पतीशी याबद्दल बोलू शकत नाहीत, अशी स्थिती असते. असा भारतीय समाज इंटरनेटवर लैंगिक ज्ञानाचा शोध घेत राहतो आणि चुकीच्या गोष्टींना बळ मिळते. स्त्रियांची सेक्स लाइफ कायमच आपल्याकडे गुप्तपणे नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तिला बंद दरवाजाआड ठेवण्याचाच कायम प्रयत्न झाला. स्त्रियांच्या या दबलेल्या लैंगिक इच्छांबाबत जरा या अहवालातील कथा जाणून घ्या... 

वैज्ञानिक दृष्टीने विचार करता, स्त्रियांची सूप्त लैंगिक इच्छा ही मासिक पाळीच्या चक्रानुसार सतत बदलत असते. मात्र जोडपी महिन्यातून कित्येकदा सेक्स करतात. काही जण आपल्या कामाच्या वेळा आणि तब्येत सांभाळून सेक्सला वेळ देतात. 

स्त्रियांची लैंगिक क्षमता ही पुरुषांच्या क्षमतेपेक्षा काही कमी नसते. फक्त तिचे चक्र बदलत असल्याने मूड्स बदलत जातात. त्यांची लैंगिक उत्तेजना, orgasm हा पुरुषांपेक्षा वेगळा असतो. अनेक पुरुष स्त्रियांना ऑर्ग्झमच्या पातळीपर्यंत पोहोचवण्यात कमी पडतात. पण महिलांना अधिकाधिक रोमान्स, सेक्स हवाहवासा वाटत असतो.

लग्नानंतर सेक्सच्या व्याख्या बदलतात का

विशीतल्या नवतरुणींची लैंगिक भावना ही लग्नानंतरही तशीच राहते का, या प्रश्नाचे उत्तर या अहवालात वेगळे आहे. या दोन्ही भावनांमध्ये फरक असतो. नुकत्याच वयात आलेल्या तरुणीची सेक्सबद्दलची उत्सुकता मोठी असते. हेच प्रेम होण्याचे वय असते. त्यामुळे भिन्नलिंगी आकर्षणातून पुष्कळदा सेक्सचा अनुभव घेतला जातो. 

लग्नानंतर मात्र पती-पत्नीच्या नात्याच्या ओझ्याखाली आणि सासरच्या जबाबदाऱ्यांमुळे महिलांच्या मानसिकतेत फरक पडतो, असं या अहवालात म्हटलं आहे. स्त्रिया अधिक भावनाप्रधान असतात. सहसा कुणाहीबरोबर सेक्स करायला त्या तयार होत नाहीत. ज्या जोडीदाराबरोबर त्यांना सुरक्षित वाटते, त्याच्याकडे त्या अधिक आकर्षित होतात, असं काही समाजमानसशास्त्रज्ञांचं मत आहे. 

जुन्या बुरसटलेल्या रुढी आणि परंपराच्या ओझ्याखाली अडकलेल्या आपल्या समाजात स्त्रीचं कौमार्य, पातिव्रत्य, चूल आणि मूल यातच स्त्रीला अडकवलं जातं. पुरुषी वर्चस्व कायम ठेवण्याच्या भावनेतूनच स्त्रियांचे आणि त्यांच्या लैंगिक इच्छांचे दमन केले जाते. 
- निर्मलकुमार भोसले, समुपदेशक आणि मानसशास्त्रज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT