हिंगोली : तालुक्यातील (Hingoli) नर्सी नामदेव येथे जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी हिंगोली-सेनगाव रस्त्यावर वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) वतीने बुधवार (ता.सहा) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यामध्ये सर्वत्र अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपाच्या सोयाबीन, उडीद, मूग, तूर व हळद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करुन शेतकऱ्यांना प्रतिएकर ५० हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. खासगी बँकांनी पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना वसुलीसाठी त्रास देऊ नये, अशा सूचना कराव्यात शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तात्काळ मदत जाहीर करावी.
या प्रसंगी पोलिस प्रशासनामार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख जिल्हाध्यक्ष सुरेश धोत्रे, जिल्हा उपाध्यक्ष मोहमद जहीर, आदीं उपस्थित होते. दोन तास रास्ता रोको झाल्याने वाहतूक खोळंबली होती. यावेळी नर्सी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक कांबळे यांनी आंदोलन ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.