jalna  sakal
मराठवाडा

Jalna Vande Bharat : मुंबई फक्त 7 तासात पण तिकीट दर गुलदस्त्यातच! अशी आहे जालना वरून जाणारी वंदे भारत ट्रेन..

रेल्वे : प्रशासनाकडून तयारी पूर्ण, पण दरपत्रकच जाहीर नाही

सकाळ डिजिटल टीम

जालना : जालना ते मुंबई हे मराठवाड्यातून पहिली वंदे भारत रेल्वे शनिवारपासून (ता.३०) सुरू होत आहे. ही रेल्वे जालना ते मुंबई दरम्यान सहा रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. सर्व तयारी रेल्वे प्रशासनाची झाली आहे, मात्र अद्याप तिकिटाचे दरपत्रकच प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले नाही. यामुळे प्रवाशांत संभ्रम असून तिकिटांच्या दराबाबत इतकी गोपनीयता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान शुक्रवारी नांदेड विभागाच्या महाप्रबंधक नीती सरकार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वेसेवा, थांबे आणि सुविधा याबद्दल माहिती दिली. नीती सरकार म्हणाल्या, जालना ते मुंबई हे मराठवाड्यातून पहिली वंदे भारत रेल्वे शनिवारपासून (ता.३०) सुरू होत आहे. ही रेल्वे जालना ते मुंबई दरम्यान सहा रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे.

दरम्यान शुक्रवारी नांदेड विभागाच्या महाप्रबंधक नीती सरकार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वेसेवा, थांबे आणि सुविधा याबद्दल माहिती दिली. नीती सरकार म्हणाल्या, जालना ते मुंबई हे मराठवाड्यातून पहिली वंदे भारत रेल्वे शनिवारपासून (ता.३०) सुरू होत आहे. ही रेल्वे जालना ते मुंबई दरम्यान सहा रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर दोन मिनिटांचा वंदे भारतचा थांबा असणार आहे.

प्रवाशांसाठी ही सेवा ता.एक जानेवारीपासून सुरू होणार आहे. भारतात तयार झालेली हाय-स्पीड ट्रेन अशी या रेल्वेची ओळख असून सर्व सुविधांयुक्त ही रेल्वे असणार आहे. जालना येथून निघालेली ही रेल्वे छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक, कल्याण, ठाणे आणि दादर हा रेल्वे स्थानकावर थांबणार असल्याचे नीती सरकार यांनी सांगितले.

एका दृष्टिक्षेपात रेल्वे सुविधा

ट्रेनने जालना ते मुंबई ४३४.३६ किलोमीटरचे अंतर सहा तास ५० मिनिटांत कापले जाईल. रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस दोन्ही दिशेने ही रेल्वे धावणार आहे. या रेल्वेमध्ये एकावेळी ५३० प्रवासी क्षमता आहे, एकूण आठ डबे आहेत. जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस जालना येथून पहाटे ५.०५ ला सुटेल. ती छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, ठाणे, दादर येथे थांबेल. मुंबई येथे सकाळी ११:५५ ला पोचेल. येथून दुपारी १ः १० वाजता जालन्याकडे निघेल.

वंदे भारत रेल्वे सेवेची ठळक वैशिष्ट्ये

प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी करण्यासाठी ट्रेन आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे एकूण आठ डबे आहेत. स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे असून सर्व श्रेणीमध्ये आरामदायी आसने आहेत. चेअर कारमध्ये रिक्लाइनिंग एर्गोनॉमिक सीट्स आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये ३६० डिग्री रिव्हॉल्व्हिंग सीट्स आहेत. संपूर्ण रेल्वे वातानुकूलित आहे. रुंद आकाराच्या खिडक्यांमुळे प्रवासादरम्यान दोन्ही बाजूचे दृश्य दिसणार आहे. प्रत्येक आसनासाठी एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये मॅगझिन बॅग पुरवल्या आहेत.

जीपीएस सक्षम प्रवासी माहिती सुविधा प्रवासा दरम्यान ट्रेनची थेट माहिती देते. सुधारित प्रवेशयोग्यतेसह प्रत्येक सीटसाठी मोबाइल चार्जिंग सॉकेट, हॉटकेस, बॉटल कुलर, डीप फ्रीझर आणि हॉट वॉटर बॉयलरच्या तरतुदीसह प्रत्येक कोचमध्ये मिनी पॅन्ट्री आहे. सर्व डब्यांमध्ये दिव्यांगजनांना अनुकूल सुविधा देण्यात आल्या आहेत.

आणीबाणीच्या परिस्थितीत सुलभ प्रवेशासाठी सुधारित हॅमर बॉक्स कव्हरसह, आपत्कालीन उघडण्यायोग्य खिडक्या, प्रत्येक कोचमध्ये अग्निशामक यंत्रासह सुधारित एरोसोल आधारित आग शोधणे आणि दमन प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.

सर्व कोचवर इमर्जन्सी अलार्म पुश बटणे आणि टॉकबॅक युनिट्स आहे. व्हॉइस रेकॉर्डिंग सुविधेसह ड्रायव्हर-गार्ड संवाद आणि क्रॅश हार्डन मेमरी सुविधा आहे. टच फ्री सुविधांसह आधुनिक बायो-व्हॅक्यूम टॉयलेटही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT