file photo 
मराठवाडा

विद्यापीठाने तयार केली जिवाणू खते;  जमिनीचा सुधारतो पोतही 

कैलास चव्हाण

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागांतर्गत असलेल्‍या अखिल भारतीय मृदा जैव विविधता-जैविक खत प्रकल्पामध्‍ये विविध पिकांसाठी द्रवरूप जिवाणू खते तयार करण्यात आली आहेत. या खताद्वारे उत्पादन वाढ, जमिनीचा पोत वाढविणे, पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा करण्याचे काम करणारी ही खते शेतीसाठी उपयुक्त असल्याने विद्यापीठाने शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध  केली आहेत.
जिवाणू खत म्‍हणजे पिकांसाठी उपयुक्‍त जिवंत किंवा सुप्‍त अवस्‍थेतील जीवाणूचे निर्जंतुक वाहकामध्‍ये वाहकामध्‍ये केलेले मिश्रण. बियाणे किंवा रोपास बीजप्रक्रिया, अंतरक्षीकरण किंवा मातीतून वापरल्‍यास जमिनीत पिकांकरिता उपयुक्‍त जिवाणू संख्‍येत वाढ होऊन पिकांसाठी आवश्‍यक अन्नद्रव्‍यांचा पुरवठा होतो व उत्‍पादनात वाढ होते. जिवाणू खते ही कमी किमतीत उपलब्‍ध असून जमिनीचा पोत सुधारण्‍यासाठी त्‍यांची मदत होते. जमीन जैविक क्रियाशील बनते. मुळांच्या संख्‍येत व लांबीत भरपूर वाढ होऊन जमिनीत मुख्‍य खोडापासून दुरवरील व खोलवरील अन्नद्रव्‍य व पाणी पिकास उपलब्‍ध होते. पिकांची रोग व कीड प्रतिकारशक्‍तीत वाढ होते. पिकांना अन्नद्रव्‍ये जमिनीतून शोषण करण्‍यास मदत करतात. तसेच जमिनीची नैसर्गिक सुपिकता टिकवून ठेवतात. जिवाणू खते वापरल्‍याने रासायनिक खताची उणीव भरून काढता येत नसून ही खते रासायनिक खतासोबत पूरक खते म्‍हणून वापरणे फायद्याचे आहे. जिवाणू खतामुळे पिकांना दिलेल्‍या रासायनिक खताचा कार्यक्षमरित्‍या वापर होण्‍यास मदत होते.

 हे आहेत प्रकार 
रायझोबियम, ॲझॅक्टोबॅक्टर, स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत (पीएसबी), पालाश विरघळविणार व वहन करणारे जिवाणू खत, गंधक विरघळविणारे जिवाणू खत, जस्त उपलब्धता वाढविणारे जिवाणू खत, रायझोफॉस, ॲझोटोफॉस आदींचा समावेश आहे, अशी माहिती प्रकल्‍पाचे प्रमुख डॉ. अनिल धमक यांनी दिली.

रायझोबियमचे हे आहेत फायदे
नत्र स्थिर करणाऱ्या रायझोबियम जिवाणूच्या वापरामुळे सोयाबीन, मूग, हरभरा, भुईमूग, तूर, उडीद आदी पीक उत्‍पादनात २० टक्क्यांपेक्षा जास्‍त वाढ झाल्‍याचे आढळून आले आहे. ॲझोटोबॅक्‍टर जिवाणूमुळे पिकांची जोमदार वाढ होऊन उत्‍पादनात दहा ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होते. हे जिवाणू खत तृणधान्‍य, गळीतधान्‍य, भाजीपाला, फळझाडे, बटाटा, ऊस, कापूस, हळद, आले, फुलझाडे आदी पिकांसाठी वापरता येते. पीएसबी जिवाणू हे  स्‍फुरद विरघळविण्‍याचे कार्य करते.

जिवाणू खते वापरण्‍याची पद्धत
यात दहा किलो बियाणास १०० मिली प्रत्येकी द्रवरूप जिवाणू खताचा वापर करावा. हे द्रावण सारख्‍या प्रमाणात लावून लगेच पेरणी करावी. सोयाबीन व भुईमूग या सारख्‍या बियाणांवर पातळ आवरण असलेल्या पिकांकरिता दहा किलो बियाणास ५० मिली प्रत्येकी जिवाणू खत पुरेसे होते.


हेही वाचा : कचऱ्याचे डोंगर होणार भूईसपाट; आरोग्याचा प्रश्न लागणार मार्गी


जिवाणू खते वापरतांना घ्‍यावयाची काळजी
जिवाणू खताच्‍या बाटल्‍या उष्णतेच्‍या ठिकाणी किंवा थेट सूर्यप्रकाशात ठेऊ नयेत. जिवाणू खते कीटकनाशके, बुरशी नाशके, तणनाशके किंवा रासायनिक खताबरोबर मिसळू नयेत. जिवाणू खते बियाणास लावल्‍यानंतर थोडा वेळ सावलीत वाळवावीत. जिवाणू खते दिलेल्‍या अंतिम तारखेनतर वापरू नये. ज्‍या पिकासाठी असतील त्‍याच पिकासाठी वापरावीत. जिवाणू खते जमिनीत दिल्‍यानंतर त्‍यांना जिवंत ठेवण्‍यासाठी जमिनीत ओल असणे आवश्‍यक आहे.

यांच्याशी साधा संपर्क 
अधिक माहितीकरिता प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ. अनिल धमक (मोबाइल क्रमांक ९४२००३३०४६), सय्यद मुन्‍शी (९९६०२८२८०३), सुनील शेंडे (७५०७४४४४८८) यांच्‍याशी संपर्क करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT