Latur Vegetable Market 
मराठवाडा

लातूरचे भाजीबाजार अखेर बंद, सामाजिक अंतराचा सातत्याने उडत होता फज्जा

सकाळ वृत्तसेवा

लातूर ः येथील गुळमार्केट परिसरात असलेल्या भाजी बाजारात दररोज सामाजिक अंतराचा फज्जा उडत होता. शहरात इतर सर्व ठिकाणी कोरोनाच्या संदर्भात सुरु असलेल्या उपाय योजनेचे पालन होत आहे. या बाजारात मात्र सातत्याने त्याचे उल्लंघन केले जात होते. येथील गर्दी प्रशासन, पोलिस तसेच बाजार समितीसाठी डोकेदुःखी झाली होती. सांगूनही ऐकले जात नसल्याने अखेर हे भाजीबाजारात बुधवारपासून (ता.२२) बंद करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी पहिल्यांदाच या बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.


कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना म्हणून टाळेबंदी सुरु आहे. पण यात भाजीपाला विक्रीला सूट देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्यापासून येथील भाजी बाजार सुरु राहिले. हे होलसेल बाजार आहे. शेकडो शेतकरी आपला भाजीपाला पहाटेपासून घेऊन येतात. ते खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तसेच शहरात गाड्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. हे सर्वजण येथूनच भाजीपाला खरेदी करतात. इतकेच नव्हे तर येथे भाजीपाल्याचे दर कमी राहत असल्याने शहरातील रहिवाशी भाजीपाला खरेदीसाठी या बाजारात रोज येतात.


टाळेबंदीच्या काळात पहिल्यापासूनच हे भाजी बाजार प्रशासन, बाजार समिती तसेच पोलिसांची डोकेदुःखी झाले होते. वाढती गर्दी लक्षात घेता काही दिवसांपासून येथे किरकोळ भाजीपाला खरेदी करण्यावर बंधने घालण्यात आली. गल्लोगल्ली फिरणाऱ्यां गाड्यावरूनच लातूरकर भाजीपाला खरेदी करावा असे आवाहनही करण्यात आले होते. पण या बाजारात भाजीपाला दर कमी असल्याने रहिवाशांची गर्दी काही कमी होताना दिसत नव्हती. या ठिकाणी दररोज पहाटेपासूनच पोलिस तैनात करावे लागत होते, असे असतानाही सामाजिक आंतराचा सातत्याने फज्जा उडत होता. त्यामुळे बाजार समितीने बुधवारपासून हे भाजी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच या बाजारात शुकशुकाट राहिला. बाजार बंद करणे हा काही उपाय होऊ शकत नाही. दररोज शेकडो शेतकरी भाजीपाला घेऊन या बाजारात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र सुरु राहते. हे लक्षात घेऊन या बाजाराला मोठी जागा देऊन तेथे सामाजिक अंतर राखत कशा पद्धतीने ते सुरु करता येईल याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.



भाजी बाजारची जागा कमी आहे व तेथे गर्दी जास्त होत आहे. त्यामुळे बागवान व शेतकऱ्यांची बैठक घेऊन हे मार्केट रिंगरोडवरील गुळ मार्केट परिसरात हलवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या गुळमार्केटमध्ये जागा भरपूर आहे. सर्व सुविधा उपलब्ध आहेत. पण तेथे कोणी खरेदीसाठी येणार नाही म्हणून थोडा विरोध झाला. वारंवार सूचना देऊनही या मार्केटमधील गर्दी कमी होत नसल्याने ते बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. येत्या एक दोन दिवसांत पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
- ललितभाई शहा, सभापती, लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

'राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष सोडून गेलेल्‍या गद्दारांना पाडाच'; शरद पवारांचा अजितदादांच्या आमदारांना इशारा

Ajit Pawar: पार्थ पवार म्हणतात, भाजप-शिवसेनेसोबत गेल्याने आम्ही बदलणार नाहीत; आम्ही तर...

Fraud Calls : अलर्ट! या नंबरवरुन येणारे कॉल आहेत धोक्याचे; क्षणात होऊ शकतो मोबईल हॅक अन् अकाउंट रिकामं

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम, आता एक व्हावे लागेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT