हिंगोली : कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घर व परिसर स्वच्छतेबरोबरच वैयक्तिक स्वच्छता ठेवणे महत्वाचे असून सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे असल्याची माहिती डॉ. मनिष मुपकलवार यांनी दिली.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे ते योग्यच आहे. प्रशासनातील सर्वच अधिकारी यात सहभागी झाले आहेत. नागरिकांनी गर्दी करू नये, सोशल डिस्टन्स पाळा असे वेळोवेळी सांगितले जात आहे.
शिंकताना किंवा खोकताना रुमाल धरावा
कोरोनाला हरविण्यासाठी तोच एकमेव उपाय आहे. कोरोना टाळण्यासाठी परिसर स्वच्छतेबरोबरच वैयक्तिक स्वच्छता देखील महत्वाची असल्याचे ते म्हणाले. वारंवार नाका, तोंडाला हाताचा स्पर्श करू नये, हात साबणाने स्वच्छ धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, शिंकताना किंवा खोकताना नाका, तोंडावर रूमाला धरावा, आरोग्य विभागातर्फे देण्यात येणाऱ्या सुचनाचे पालन केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.
नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे
जिल्ह्यात आता एकही कोरोना रुग्ण नाही. एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्या रुग्णही आता ठणठणीत बरा झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. तरी देखील लॉकडाउनच्या कालावधीपर्यंत सर्व गोष्टीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे श्री. मुपकलवार यांनी सांगितले.
गावकऱ्याची काळजी घेण्यासाठी सज्ज
आखाडा बाळापूर : येथील गावकऱ्यांची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सज्ज असून गावकऱ्यांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन उपसरपंच विजय बोंढारे यांनी केले आहे. परभणी येथे कोरोना रुग्ण सापडल्यानंतर त्याचे आखाडा बाळापुरात जोरदार चर्चा सुरू झाली होती.
अफवांवर विश्वास ठेवू नये
आखाडा बाळापूर व परिसरातील सात जणांना जिल्हा सामान्य पाठवण्यात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडिया व इतर समाज माध्यमातून कुठल्याही प्रकारचे अफवा पसरवणारे वक्तव्य करू नये, आखाडा बाळापूर ग्रामपंचायत कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज आहे.
येथे क्लिक करा- ...तर भारतही लवकरच कोरोनामुक्त होईल ! कोण म्हणाले वाचा
आरोग्य तपासणी करून घ्यावी
ग्रामपंचायतीने शहरातील सर्व भागांमधून निर्जंतुकीकरण केले असून पुढील काळात पुन्हा एकदा निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. नागरिकांनी आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, घरातील केरकचरा कुठेही फेकून देऊ नये, तसेच परिसरातील नाल्या वाहत्या कराव्यात, पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, मोठ्या शहरातून आलेल्या गावकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन उपसरपंच श्री. बोंढारे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.