photo 
मराठवाडा

व्हिडीओ- हिंगोलीत विम्याच्या पैशासाठी शेतकरी संघटनेने केली तोडफोड

राजेश दारव्हेकर

हिंगोली : विम्याचे पैसे देण्यात यावे, या मागणीचे निवेदन घेण्यासाठी शहरातील एनटीसी भागातील विमा कंपनीच्या कार्यालयात कोणीच नसल्याने गुरुवारी (ता. ३०) संतप्त स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड करत घोषणाबाजी केली.

मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शासन दरबारी शेतकऱ्यांना मदत मिळाली. मात्र, शेतकऱ्यांनी पीकविमा काढूनही विम्याची रक्‍कम अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी विमा कंपनीकडे पीकविम्याच्या पैशासाठी चकरा मारत आहेत. परंतु, विमा कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी संतप्त होत आहेत. तसेच यासंदर्भात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. 

कार्यालयातील कर्मचाऱ्यांना फोनही लावाला

या बाबत युवा आघाडीचे जिल्‍हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी पोलिस अधीक्षकांकडे मंगळवारी (ता. २८) आंदोलनाबाबत निवेदन दिले होते. त्‍याप्रमाणे स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी गुरवारी (ता.३०) विमा कंपनीच्या कार्यालयात आले. परंतु, कार्यालयात कोणीच उपस्थित नव्हते. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना फोनही लावाला. 

शेतकरी संघटनेचे पदाधिकारी संतप्त

मात्र, अर्धा तास झाला तरी सबंधित कर्मचारी आले नसल्याने तसेच कार्यालयातील अस्‍ताव्यस्‍त पडलेले सामान, शिगारेटची पाकिटे पाहून स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी संतप्त झाले. त्यानंतर कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करत घोषणाबाजी केली. यामध्ये स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्‍हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, युवा जिल्‍हा आघाडीचे नामदेव पतंगे, पराग अडकिणे, नारायण कदम, गोपीनाथ बहादरे, विलास होडगीर, सुभाष गाडगे, बापूराव गरड, किशनराव पाटील आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. 

खरीप हंगाम हातचा गेला

खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला नाही. कमी-अधिक पावसामुळे पिके धोक्यात आली होती. त्यामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. सकाळपासून सायंकाळपर्यंत विम्याचे पैसे भरण्यासाठी ताटकळत थांबावे लागले. दरम्यान, परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. सोयाबीन, कापूस आदी पिके हातची गेली. त्यामुळे शासनाने पिकांची नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले. मात्र, पिकांचा विमा काढूनही विमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. 

समाधानकारक उत्तरे मिळेनात

शेतकऱ्यांनी रांगा लावून पीकविमा भरला. मात्र, या बाबत विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. पिकांचे नुकसान होऊनही विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून विम्यापोटी पैसे घेतलेच कशासाठी? असा सवाल शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा देण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Uddhav Thackeray: सरकार कुणी पाडलं, राज ठाकरेंबरोबर जाणार का? उद्धव ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT