खासदार चिखलीकरांनी दिला एक कोटींचा निधी 
मराठवाडा

Video - खासदार चिखलीकरांनी दिला एक कोटींचा निधी

अभय कुळकजाईकर

नांदेड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय जनता पक्षाचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या खासदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान सहाय्यता निधीला सुपूर्द केला आहे.

खासदार चिखलीकर यांनी याबाबतची माहिती रविवारी (ता. २९) पत्रकारांना दिली. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, मिलिंद देशमुख आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार खासदार या नात्याने आपण पंतप्रधान सहाय्यता निधीला धनादेश दिला असल्याचे श्री. चिखलीकर यांनी सांगितले.   

वेतनातूनही दिली एक लाखाची रक्कम
पंतप्रधान सहाय्यता निधीला एक कोटीच्या निधीशिवाय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आदेशानुसार माझ्या खासदाराच्या पगारीतून एक लाख रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीला देण्यात आले असल्याची माहिती खासदार चिखलीकर यांनी दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी प्रत्येक खासदारांनी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे सूचित केले होते. त्याची अंमलबजावणी करीत मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार एक कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्राव्दारे सुपुर्द केला आहे. माजी मुख्यमंत्री भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी २५ हजार रुपये रोख प्रदेश भाजपाकडे सुपुर्द करण्यात आले असल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले.

मोठ्या ताकदीने लढा सुरु
कोरोनाशी मुकाबला करणारी देशातील जनता मोठ्या ताकदीने लढा देत आहे. देशात संचारबंदी काळात देशातला एकही माणुस अन्नाशिवाय उपाशी राहता कामा नये, अशी भूमिका घेवून सर्वसामान्यांच्या मदतीला केंद्र सरकार धावून जात असल्याचे दिलासादायक चित्र संपूर्ण देशभरात निर्माण झाले असतानाही महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय यंत्रणेला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जी तत्परता दाखवायला हवी ती दिसत नसल्यामुळे अनेक शासकीय रुग्णालयात व्हेंटीलेटरची कमतरता भासत असल्याचे वृत्त असून त्याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

व्हेंटीलेटरची व्यवस्था हवी
नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात व्हेंटीलेटरची आवश्यकता असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. व्हेंटीलेटर खरेदीसाठी खासदार या नात्याने निधी देण्यास तयार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सांची भेट घेऊन सांगितले. परंतु त्यांनी मला महाराष्ट्र शासन निधी देणार असल्याचे सांगितले आहे. अद्याप तरी महाराष्ट्र शासनाकडून तशी पाऊले उचलण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. किती जणांचा बळी गेल्यानंतर महाराष्ट्र शासन ही सुविधा उपलब्ध करुन देणार आहे असा प्रश्‍नही चिखलीकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

भाजपच्या वतीने गरजूंना मदत
नांदेड जिल्हा भाजपाच्यावतीने दररोज २५० गोरगरीब लोकांना दोन टाईम जेवणाची व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. लोहा येथे बाहेर गावाहून आलेल्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था कारेगांव येथील गुरुव्दाराच्यावतीने करण्याची विनंती आपण केली असून त्यांनी जेवणाची व्यवस्था करण्यास तयारी दर्शवली आहे. कंधार शहरात बाहेरगावाहून आलेल्या लोकांना एकनाथ महाराज उम्ररजकर देवस्थानच्या वतीने व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती खासदार चिखलीकर यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT