फोटो 
मराठवाडा

Video : रिकामटेकड्यांना माकड उड्यांची अनोखी शिक्षा 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना या वैश्‍वीक महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशासह जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमध्ये कामाशिवाय व अत्यावश्‍यक सेवेतील लोकांनीच घराबाहेर पडावे असे आदेश असतांनाही अनेक रिकामटेकडे घराबाहेर पडून प्रशासनाला त्रासुन सोडत आहेत. अशा रिकामटेक्ड्यांची शनिवारी (ता. ११) वजिराबाद चौकात चांगलीच हजेरी घेण्यात आली. पोलिसांनी त्यांना माकड उड्या मारावयास लावून लॉकडाऊन संपेपर्यंत मी घरातून बाहेर पडणार नाही असे वदवून घेतल्याने अनेक रिकामटेकड्यांचे धाबे दणाणले आहे. 

कोरोनासारख्या महाभयंकर आजाराला रोखण्यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासन सतत प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनमध्ये घरातून नागरिकांनी बाहेर पडू नये अशा सुचना वेळोवळी पोलिस देत आहेत. परंतु काही रिकामटेकडे कामाशिवाय घराबाहेर पडत पोलिसांना हुज्जत घालत आहेत. अशांना पोलिसांच्या दंडुक्यांचा प्रसाद पाहिजे मात्र पोलिस यंत्रणा अतिशय मवाळ शब्दात अशांना समज देऊन परत पाठवित आहे. 

दंडुक्याच्या प्रसादाऐवजी साधी शिक्षा 

पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर हे आपल्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बळावर जिल्हा व शहरात बंदोबस्त करत आहेत. मागील एक महिण्यापासून पोलिस आपल्या सेवेसाठी रस्त्यावर आहे. परंतु काही महाभाग त्यांच्याशी वाद घालून पोलिसांचे खच्चीकरण करत असल्याचे प्रकार घडत आहेत. पोलिसांनी आता दंडुक्याच्या प्रसादाऐवजी साधी शिक्षा देण्याचा विडा उचलला आहे. काही ठिकाणी उठा- बैस तर काही ठिकाणी माकडउड्या अशी शिक्षा देण्यात येत आहे. 

माकडउड्याने रिकामटेकडे हैराण

शनिवारी (ता. ११) वजिराबाद चौकात कामाशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी थांबविले. त्यांना तळपत्या उन्हात रस्त्यावर अर्धा तास बसविले. त्यानंतर त्यांना माकड उड्या मारण्यास भाग पाडले. लॉकडाऊन संपेपर्यंत मी घरातून बाहेर पडणार नाही, पडल्यास कडक शिक्षा करा असे वचन त्यांच्या तोंडून वदवून घेतले. तसेच त्यांनी तंबी देऊन आल्या त्याच मार्गाने परत जाण्यास सांगितले. 

शहर वाहतुक शाखेची कसरत 

शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरिक्षक चंद्रशेखर कदम, फौजदार श्री. सांगळे, श्री. वानोळे, हवालदार काकासाहेब रोडके, श्री. धुमाळ, रवि राठोड, सरदार मान यांच्यासह महिलां कर्मचारी व अधिकारी रिकामटेकड्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांची वाहने जप्त करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात जवळपास वाहतुक शाखेने एक कोटीहून अधीक दंड लावला आहे. तर पाचशेहून अधिक वाहने जप्त करण्यात आलेत. नांदेडकरांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT