परभणी : होमिओपॅथी शास्त्रात संसर्गजन्य आजारावर उपचार करताना नैसर्गिक सोर्सचा वापर करण्यात येतो. त्यामुळे ही उपचार पद्धती अत्यंत गुणकारक ठरू शकते. कोविड १९ सारख्या आजारावर उपचार करण्यासाठी त्या रोग्याची लक्षणे व त्याची मानसिकता या बाबी केंद्रभूत धरून उपचार केले जातात. त्यामुळे निश्चित होमिओपॅथी उपचार पद्धती या परिस्थितीत प्रभावशाली ठरू शकते, असे मत परभणीतील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. मंजुषा नरवाडकर यांनी व्यक्त केले.
‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध स्तरांवर काम सुरू आहे. अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच इतर शास्त्रांतील तज्ज्ञ मंडळी यावर काम करीत आहेत. परंतु, होमिओपॅथिक उपचार पद्धती यासाठी अत्यंत प्रभावशाली ठरत आहेत. या संदर्भात परभणीतील प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. मंजुषा नरवाडकर यांनी महिती दिली.
उपचार पद्धतीचा म्हणावा तितका प्रसार नाही
होमिओपॅथिक शास्त्रात मनुष्याची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेक उपाय सुचविण्यात आले आहे. त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सध्याच्या कोरोना विषाणूसारख्या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी अनेक उत्तम पर्याय होमिओपॅथिक शास्त्रात दिलेले आहेत. परंतु, या उपचार पद्धतीचा म्हणावा तितका प्रसार न झाल्याने लोक या उपचार पद्धतीकडे येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही उपचार पद्धती नैसर्गिक सोर्स, जसे प्लॅन्ट, मिनरल यासारख्या नैसर्गिक सोर्सद्वारे औषधी तयार केल्या जातात. त्याचा चांगला फायदा होतो. कोरोना विषाणूसारख्या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथीची औषधी निश्चित फायदेशीर ठरू शकतात. रुग्णाची सध्याची स्थिती व त्याची मानसिक परिस्थिती पाहून आम्ही उपचार करत असतो, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - तो पुन्हा येणार, मराठवाड्याला भिजवणार
व्यायाम करा, जंकफूड टाळाच
कोरोनासारख्या आजरापासून स्वतःचा व आपल्या कुटुंबाच बचाव करायचा असेल तर सर्वात आधी स्वच्छता ही अंगी बाळगली पाहिजे. दररोज घरातील सर्व सदस्यांनी त्यांच्या शक्तीप्रमाणे व्यायाम केलाच पाहिजे. ताजे अन्न सेवन करावे. जंकफूड टाळलेलेच बरे, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.
मुले व वृद्धाची घ्यावी लागते काळजी
कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर आधी घरातील लहान मुले व वयोवृद्ध सदस्यांची काळजी घ्यावी लागते. कारण त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना या संसर्गाची बाधा होऊ नये, याची प्रथमत: काळजी घेतली पाहिजे. - डॉ. मंजुषा नरवाडकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.