Fulambri sakal
मराठवाडा

Fulambri News : नेत्यांच्या गावबंदी नंतर आता राजीनाम्याचे सत्र सुरू!

फुलंब्री तालुक्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांनी नेत्यांना गावबंदी केली आणि आता आपल्या पदाचा राजीनामा देऊन निषेध व्यक्त केला जात आहे.

नवनाथ इधाटे

फुलंब्री - फुलंब्री तालुक्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांनी नेत्यांना गावबंदी केली आणि आता आपल्या पदाचा राजीनामा देऊन निषेध व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंचांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर 21 सदस्यांनी राजीनामा देऊन मराठा आरक्षण मिळत नसल्याचा संताप व्यक्त केला आहे. सदरील राजीनामाचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक राठोड यांना बुधवारी (ता.२५) रोजी दिले आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्याने सरकार गांभीर्य घेत नाही. त्यामुळे तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी आपापल्या गावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. तर आता पुन्हा मराठा समाज आक्रमक झाला असून ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांनी आपापल्या पदाचा राजीनामा देण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे आता गावबंदी नंतर राजीनामाचे सत्र सुरू झाल्यामुळे तालुक्यातील आणखी किती ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सोसायटीचे पदाधिकारी राजीनामा देणार हे आगामी काळातच दिसून येणार आहे.

• राजीनामे दिलेल्या गावांची व पदाधिकाऱ्यांची नावे •

• ग्रा.पं. बोरगाव अर्ज : सरपंच शिवाजी खरात, उपसरपंच मनीषा बलांडे, ग्रामपंचायत सदस्य सोनाजी सावळे, योगिता काळे, चंद्रकला बलांडे, आरती बिरारे, कल्पना ठोंबरे, दादासाहेब बलांडे, गणेश वाघ.

• ग्रा.पं. नायगव्हाण : सरपंच जगन दाढे, उपसरपंच धोंडीबा वाघ, ग्रामपंचायत सदस्य आप्पाराव दाढे, शेख इकबाल, गीताबाई वाघ, सीमा महापुरे, सविता दाढे, उमा महाले.

• ग्रा. पं. धानोरा : उपसरपंच शामराव साळुंके, ग्रामपंचायत सदस्य सिंधुबाई साळुंके, विजया साळुंके, चंद्रकलाबाई साळुंके, छायाबाई साळुंके.

• ग्रा.पं. टाकळी कोलते : ग्रामपंचायत सदस्य रामदास काकडे, सविता कोलते, बाबासाहेब हिवराळे, गजानन कोलते.

• विविध कार्यकारी सोसायटी बोरगाव अर्ज : बोरगाव अर्ज येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन देवराव बलांडे, व्हाईस चेअरमन रयाची काळे, सोसायटी संचालक प्रदीप बलांडे, अण्णा काळे, अशोक ठोंबरे, सुनील बिरारे, कडूबाई ठोंबरे, रमेश सुस्ते, उत्तम साळवे.

पेंडगावच्या पती-पत्नीचा राजीनामा

मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील पेंडगाव येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व सोसायटीचे चेअरमन पती-पत्नी असल्याने या दोघांनीही राजीनामा दिला आहे. ग्रामपंचायत सरपंच पदी असणाऱ्या सोनाली बाबुराव डकले यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. तर त्यांचे पती विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाबुराव बाजीराव डकले यांनी चेअरमन पदाचाही राजीनामा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT