potra 
मराठवाडा

पोतरा गावच्या शिरपेचात विशालच्या खेळामुळे मानाचा तुरा

सकाळ वृत्तसेवा

पोतरा ः कळमनुरी तालुक्‍यातील पोतरा येथील विशाल रायपूरे याने आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर क्रिकेटमध्ये नावलौकीक मिळविला असून त्‍याची आशिया चषक क्रिकेट स्‍पर्धेसाठी निवड झाल्याने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. 

विशाल संभाजी रायपुरे हा वडार समाजातील होतकरू विद्यार्थी आहे. त्याचे आई-वडील दगड फोडण्याचे काम करतात. ते सध्या मध्यप्रदेशात कामासाठी गेले आहेत. विशालच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात सीबीएस कॉन्व्हेन्ट स्कूल मधून झाली आहे. आणि त्यानंतर तो हिंगोली येथील विद्यानिकेतन इंग्रजी स्कूल मध्ये दहावीत शिकत आहे.  

हिंगोलीचे नाव नंबर एकवर ठेवले 
शिक्षण घेत असताना विशालची क्रिकेटमधील आवड, नैपुण्य पाहून शाळेने त्याला प्रोत्साहन दिले आहे. त्‍याची नांदेड येथील क्रिकेट सामन्यात निवड झाली व तिथेही विशालने चुणूक दाखवली व विशालची निवड सोलापूर स्टेट लेवलसाठी झाली. या ठिकाणी त्‍याने नंबर एकमध्ये तो निवडला गेला आहे. तिथून पुढे पंजाब येथे त्‍याची निवड झाली. तिथेही त्‍याने गावासह हिंगोलीचे नाव कायम नंबर एकवर ठेवले. आज तो आंतरराष्ट्रीय लेवलवर मलेशिया येथे तो जाणार आहे.

ग्रामस्‍थांनी दिल्या शुभेच्छा 
ग्रामीण भागातील मुलगा आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत मजल मारू शकतो. हे स्वप्नवत वाटत आहे. विशालच्या या कामगिरीबद्दल पोतरा येथील ग्रामस्‍थांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विशाल रायपुरे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारूपाला आला आहे. पोतरा गावातून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. यापुर्वी अन्वेश मुलगीर याने मलेशिया येथे आंतरराष्‍ट्रीय धनुर्विद्या स्‍पर्धेत सहभाग घेतला होता. त्‍यानंतर आता विशाल रायपुरे यांने देखील भरारी घेत आंतरराष्ट्रीय आशिया चषक क्रिकेट स्‍पर्धेत झेप घेतली आहे. त्‍यामुळे गावच्या शिरपेचात मानाचा तुर रोवला गेला आहे. त्‍यांच्या यशाबद्दल त्‍याचे नातेवाईकांसह ग्रामस्‍थातून अभिनंदन केले जात आहे. 

अभ्यास सांभाळत क्रिकेट खेळलो
लहानपणापासुन क्रिकेटचे आकर्षण होते. अभ्यास सांभाळत मोकळ्या वेळात क्रिकेट खेळत असे. शाळेतून होणाऱ्या विविध स्‍पर्धेत सहभागी घेत तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याने आज आशिया स्‍पर्धेसाठी निवड झाल्याने अत्यानंद झाला आहे. - विशाल रायपुरे.   

राष्ट्रीय स्‍पर्धेत दाखविली चुणूक 
हिंगोली जिल्‍ह्यातून एका ग्रामीण भागातून आलेला विशाल रायपुरे हा क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू आहे. त्‍याची बॅटींग सुंदर आहे. त्‍याने आतापर्यंत कोल्‍हापुर, सोलापूर, नांदेड यासह पंजाब राज्यातील भगवाड येथे राष्ट्रीय स्‍पर्धेत चुणूक दाखविल्याने त्‍याची निवड आता आशिया चषक स्‍पर्धेसाठी झाली आहे. - भुजंग चिटेवार, ऑलम्‍पीक असोसिएशचे नांदेड जिल्‍हा प्रतिनिधी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

SCROLL FOR NEXT