File photo 
मराठवाडा

‘या’ शहरात रूग्णवाहिकेची ‘वाट’ बिकट 

प्रमोद चौधरी

नांदेड :  बेफाम वाहने, बेशिस्त दुचाकीस्वार, आॅटोरिक्षांसह इतरही वाहनधारकांनी नियमच धाब्यावर ठेवल्याने शहरातील रुग्णवाहिका कोंडीत सापडल्या आहेत. रस्त्यावरून धावताना मोकळी वाट नसल्याने चालकांची मोठी अडचण होत आहे. कळस म्हणजे रुग्णांचा जीवही टांगणीला लागत असून नातेवाइकांच्या काळजाची धडधड वाढत आहे.

रुग्णवाहिकांची वाट होतेय बिकट
शहरामध्ये राजकाॅर्नर ते वजिराबाद सिग्नल, बाफना, देगलूर नाका हे मुख्य रस्ते असून, 24 तास या ठिकाणी वर्दळ असते. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना बेशिस्तपणे वाहनांची पार्किंग होत असल्याने, तसेच फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्यावरूनच शासकीय रुग्णालयासह, डाॅक्टरलेन, शिवाजीनगर आदी परिसरांती मोठ्या रुग्णालयांत रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिकाही धावतात. मात्र, बेशिस्त वाहतुकीमुळे या रुग्णवाहिकांची वाट दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. चालकांच्या असंवेनशील वृत्तीमुळे रुग्णांच्या जिवाशी एकप्रकारे खेळच होतो आहे.

वाहनधारकांची बेफिकिरी रुग्णांच्या जिवावर
रविवारी (ता.दोन) शहरातील मुख्य रस्ते असलेल्या राज काॅर्नर ते वजिराबाद सिग्नल या रस्त्यावरून धावणाऱ्या एका रुग्णवाहिकेचे निरीक्षण केले असता, गंभीर चित्र समोर आले. या रस्त्यावरून दिवसाकाठी वीसहून अधिक रुग्णवाहिका धावतात. शिवाय बाफना, देगलूर नाका येथून असंख्य रुग्णवाहिका रुग्णांना घेऊन शहरात येतात. रुग्णांना तत्काळ रुग्णालयात पोचवून त्यांचे प्राण वाचविणे हा प्रमुख उद्देश रुग्णवाहिका चालकांचा असतो. त्यांचा एक-एक मिनिट महत्त्वाचा. मात्र, शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे रुग्णवाहिकांना मोठ्या कष्टाने वाट काढावी लागते. वाहनांच्या गर्दीत रुग्णवाहिका अडकून पडल्याचे, तसेच सायरन वाजवूनही वाहनधारकांनी वाट मोकळी करून दिली नसल्याची बेफिकिरी दिसून आली.

  1. रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्त वाहनांची पार्किंग
  2. फेरीवाल्यांचे अतिक्रमण
  3. पोलिसांकडून तत्काळ मार्ग उपलब्ध करून दिला गेला नाही
  4. रुग्णवाहिकेचे सायरन ऐकूनही वाहनधारकांनी वाट दिली नाही
  5. रुग्णवाहिका पाहूनही वाहने आडवी येत होती.

काय करावे

  • रुग्णवाहिकांना वाट करून द्यावी, हा पोलिसांसाठी केआरए ठरावा
  • मुख्य रस्त्यावर स्वतंत्र लेनमधून इतर वाहनांना प्रवेश निषिद्ध करावा
  • पुण्याच्या धर्तीवर वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग तयार करावा
  • सजगता बाळगून नागरिकांनीही रुग्णवाहिकांसाठी वाट मोकळी करून द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

'राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष सोडून गेलेल्‍या गद्दारांना पाडाच'; शरद पवारांचा अजितदादांच्या आमदारांना इशारा

Ajit Pawar: पार्थ पवार म्हणतात, भाजप-शिवसेनेसोबत गेल्याने आम्ही बदलणार नाहीत; आम्ही तर...

Fraud Calls : अलर्ट! या नंबरवरुन येणारे कॉल आहेत धोक्याचे; क्षणात होऊ शकतो मोबईल हॅक अन् अकाउंट रिकामं

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम, आता एक व्हावे लागेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT