Water Supply to Be Disrupted Again in Selu Despite Payment of Rs 10 Lakh Sakal
मराठवाडा

Selu News : सेलू नगर पालिकेने दहा लाख रूपये भरूनही पाणी पुरवठा पून्हा होणार खंडित

सेलू शहराला लोअर दुधना प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. शहरातील विविध भागात असलेल्या सहा जलकुंभात प्रकल्पाजवळ असलेल्या पंप हाऊसमधून पाणी सोडण्यात येते.

विलास शिंदे

सेलू : सेलू नगर पालिकेने पाणीपट्टीची ८३ लाखांची थकबाकी पैकी दहा लाख रूपये भरूनही जालना जलसंपदा विभागाकडून शहराचा पाणी पुरवठा शुक्रवारी (ता. १५) रोजी खंडित करण्यात येणार असल्याचे जाहिर प्रगटन एका वृत्तपञात झाल्याने पुन्हा सेलूकरांना नगर पालिकेच्या या धोरणाने पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार आहे.

सेलू शहराला लोअर दुधना प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. शहरातील विविध भागात असलेल्या सहा जलकुंभात प्रकल्पाजवळ असलेल्या पंप हाऊसमधून पाणी सोडण्यात येते. नगर पालिकेने शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी सहा झोन केले आहेत. त्यानुसार शहरात दोन दिवसाआड मुबलक पाणीपुरवठा केला जातो. शहरात जवळपास ७,३३४ हजार नळधारक आहेत. दररोज २९ लाख लिटर पाण्याची गरज आहे. थकीत पाणीपट्टीचा भरणा करण्यासाठी

जलसंपदा विभागाकडून पालिकेला नोटीस देण्यात येते. त्यानंतर काही लाखांचा भरणा केल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत केला जातो. सेलू नगर पालिकेचा थकबाकीचा आकडा दरवर्षी वाढत चालला आहे. जलसंपदा विभागाकडून वारंवार सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, वेळेत थकबाकीचा भरणा न केल्याने जलसंपदा विभागाने या आगोदर दुधना प्रकल्पाजवळील पालिकेच्या पंप हाऊसला टाळे लावले होते. उन्हाळ्याचा मार्च महिणा, मुस्लिम समाजाचा रमजान महिणा व विद्यार्थ्यांची दहावी, बारावीची परिक्षा हे लक्षात घेता पालिका प्रशासनाने मंगळवारी जलसंपदा विभागाकडे दहा लाख रूपये भरूनही जलसंपदा विभागाने

शुक्रवारी एका प्रसिध्द वृत्तपञात जाहिरात देवून सेलू नगर पालिकेकडे ८३ लाख ६२ हजार रूपये एवढी थकबाकी दाखवून (ता.१५) मार्च -२०२४ रोजी सेलू शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे सेलू नगर पालिकेने यापुर्वी दहा लाख रूपयाचा चेक बाऊंस झाला की काय? याची चर्चा सेलूकरात होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT