नांदेड : स्त्रीभ्रूणहत्या वरील हस्तशिल्प असो की बलात्कारामुळे हतबल झालेल्या मुली- महिला भारतमातेकडे शरण मागत असल्याचे चित्र असो की पद्मपाणी, फ्लाईंग अप्सरा, ग्लोबल वार्मिंग या संकल्पना मुक्ताबाई आपल्या कलाद्वारे व्यक्त करतात. अशा या बहुआयामी महिला कलाकाराची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर त्यांनी आपल्या कलेबद्दल सकाळकडे सर्व माहिती दिली.
मुक्ताबाई पवार यांचा जन्म आठ एप्रिल १९५२ रोजी कर्नाटक राज्यातील बीदर जिल्ह्यातील देवला तांडा येथे देवला बिल्लू नाईक व आई रत्नाबाई यांच्या उदरी झाला. मुक्ताबाई यांना लहानपणापासुन विणकामाची आवड आई रत्नाबाई यांच्याकडून निर्माण झाली. मुक्ताबाईना दुर्मिळ कलेची आवड लहानपणापासूनच आईकडून बाळकडूचे शिक्षण मिळाले. मुक्ताबाई या आदिवासी भागात असल्यामुळे त्यावेळी कोणतेही शिक्षण मिळाले नाही. संपूर्ण आयुष्य शिक्षणात अशिक्षित असून सुद्धा त्या बंजारा हस्तकला जिवंत ठेवत आहेत. सध्या मूळ रामदास तांडा तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे २० वषापार्सून कोणतेही प्रशिक्षण घेतले नसतांना अतिशय चांगल्या पद्धतीने बंजारा हस्त शिल्पांची काम करण्याचा वसा यथायोग्य चालवत आहेत. आजही ६८ वर्ष वय असताना सकाळी चार वाजल्यापासून त्या नित्यनियमाने दररोज आठ ते दहा तास हस्तशिल्प विणकाम करत आहेत.
हेही वाचा - खबरदार...! मटका, जुगार चालवाल तर..
तयार बांगड्यापासून स्वसंरक्षण
आदिवासी बंजारा समाज हा तांड्यावर, जंगलात वास्तव्य करून राहतो. त्यांना ऊन -वारा- पाऊस यांच्यापासून संरक्षण व्हावे म्हणून जाडेभरडे कपडे वापरावे लागतात. हातात बांगड्या अशा घातलेल्या असतात की कोणीही प्रहार केला तरी त्यापासून संरक्षण व्हावे. उदरनिवाहार्साठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते अशी समाजाची अवस्था असल्यामुळे त्यांना पोशाखही त्याच पद्धतीचा असतो. हीच २०० वर्षाची संस्कृती कायम रहावी यासाठी गेल्या चाळीस वषापासून मुक्ताबाई हस्तशिल्पच्या माध्यमातून कांचळी (चोळी), चादर (ओढणी), फेट्या (परकर), घुंगरो ( घुगरी टोपली), चुडी, गळणो, कसोट्या कोतळी, सराफी आदी निर्माण करत आहेत.
कांचळी (ब्लाऊज) राष्ट्रीय स्तरावर
सन २००५ मध्ये त्यांनी तैयार केलेले कांचळी (ब्लाऊज) राष्ट्रीय स्तरावर गेली. तसेच त्यांनी तयार केलेल्या स्त्रीभ्रूणहत्या वरील हस्तशिल्प असो की बलात्कारामुळे हतबल झालेल्या मुली- महिला भारतमातेकडे शरण मागत असल्याचे चित्र असो की पद्मपाणी, फ्लाईंग अप्सरा, ग्लोबल वार्मिंग या संकल्पना मुक्ताबाई आपल्या कलाद्वारे व्यक्त करतात. पारंपरिक बंजारा शैलीतील व कापडावर तयार केलेली शिल्पाची विभागीय प्रशिक्षणासाठी निवड झाली होती.
येथे क्लीक करा --नांदेडमधील ‘ही’ खेडी कात टाकणार
कलेला आपलेसे करणाऱ्या
यंत्राचा वापर न करता रंगीत धाग्याच्या साहाय्याने देशाचे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, इंदिरा गांधी, सोनिया गांधी, किरण बेदी, अरुणा असफअली, कमलादेवी चटोपाध्याय, फातिमा बीबी, अमृताकौर, झाशीची राणी, सुचेता कृपलानी, पी. टी. उषा, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, लता मंगेशकर, सोनाबाई आदी कर्तत्वान महिलांची चित्रे मुक्ताबाई यांनी कलेतून साकारली आहेत.
युवती- महिलांना प्रशिक्षण
हीच संस्कृती कायम रहावी म्हणून खव्या, मंडाव, पेटी, खडपा, कळेन, डी रेलो, खापली, कट्टा, माकी, कांचे, पावली, फुंदा, कोडीर सडके, लेपे, खिल्लन, कलेनी, गोटे, कोडी, पारा, वेल, जालीरो टाका, गाडर टाका, डोर टाके वापरुन त्या शिल्पकलेचे काम करत आहेत. मुक्ताबाई यांनी बनवलेल्या शिल्प कलेला लघु उद्योग संस्था, राज्य पर्यटन विकास महामंडळ, सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज कॉपोर्रेशन इंडिया, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय यांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनातून पुरस्कार मिळाला आहे. या कलेला युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी वस्त्र मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून आयोजित प्रशिक्षणामार्फत मुक्ताबाई यांनी २५० युवती व महिलांना प्रशिक्षण दिले आहे.
राष्ट्रपतीसही अन्य मंत्र्यांकडून गौरव
या कलेची प्रशंसा तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, हस्तकला विभागाचे संचालक श्री. डांगे, श्री सिंग यांनी दखल घेऊन त्यांना प्रशस्तीपत्र दिले आहे. आकाशवाणी केंद्र नांदेड, औरंगाबाद दूरदर्शन केंद्र मुंबई यांच्या माध्यमातून बातम्या व मुलाखतीद्वारे मुक्ताबाई पवार यांची कला प्रसारित करण्यात आली आहे.
महाविद्यालयातील अभ्यासक्रमात हा विषय घ्यावा
सध्या बंजारा महिलासाठी त्या जॅकेट तैयार करण्याचे काम जवळपास एक महिन्यापासून करत आहेत. हा जाकेट युवती व महिला आधुनिक पद्धतीने ह्या बंजारा कांचळीसह म्हणून वापर करतील असे त्यांचे मत आहे. त्यांनी तयार करत असलेल्या जाकेट हा फिल्ममधील अभिनेत्रीसुद्धा वापरतील असा हा अतिशय आकर्षक जाकेट तैयार होत आहे. हा जाकेट येत्या दो महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती त्यनी दिली.
यासंदर्भात मुक्ताबाई पवार यांनी सांगितले की, देशातील सर्व राज्यातील महिला या बंजारा हस्तशिल्पकडे आकर्षित होत आहेत. केंद्र शासन व राज्य शासन यांनी २०० वषापूर्वीची कला बंजारा टाके जिवंत ठेवण्यासाठी ड्रेस मेकिंग, फॅशन डिझायनिंग या कोर्ससाठी अभ्यासक्रम विद्यापीठ स्तरावर, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी अभ्यासक्रमांमध्ये हा विषय घेतला जावा. दुर्मिळ अशी कला भारतीय संस्कृती जिवंत राहून रोजगारभिमुख शिक्षणास मदत होईल असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.