What strategy of in BJP Chachur constituency assembly election Vinayakrao Patil Diliprao Deshmukh latur politics Sakal
मराठवाडा

Latur News : चाकूर मतदारसंघात नेमकं भाजपमध्ये चाललंय काय!

बंडखोरांना जिल्हाध्यक्षपद, पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना बाहेरचा दाखवला जातोय रस्ता

प्रशांत शेटे

चाकूर : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून पक्षाचा उमेदवार पाडला त्यांना जिल्हाध्यक्षपद व ज्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. त्यामुळे शिस्तीचा पक्ष असलेल्या भाजपमध्ये नेमक चाललय काय,

असा प्रश्न मतदारांकडून विचारला जात असून माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातील प्रवेशानंतर अहमदपूर - चाकूर विधानसभा मतदारसंघातील चित्रच बदलणार आहे.

अहमदपूर - चाकूर विधानसभा मतदार संघात पक्षातील विरोधक व राज्याच्या राजकारणातील उलथापालथीमुळे परंपरागत विरोधक भाजपसोबत गेल्यामुळे मतदारसंघात होणारी अडचण लक्षात घेऊन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

रविवारी (ता.२९) मुंबई येथे त्यांचा पक्ष प्रवेश होत आहे. २०१४ च्या निवडणुकीत अपक्ष राहून विजय मिळविल्यानंतर विनायकराव पाटील यांनी २०१६ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे मतदारसंघात भाजप उभारी घेत नव्हते हे पक्ष श्रेष्ठीच्या लक्षात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस यांनी विनायकराव पाटील यांच्यावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जबाबदारी सोपवली.

या निवडणुकीत तालुक्यातील जानवळ, वडवळ नागनाथ, नळेगाव, चापोली, रोहिणा या पाच ही जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमदेवार विजयी झाले. तसेच पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाली. अहमदपूर तालुक्यातून चार व चाकूर तालूक्यातून पाच सदस्य विजयी झाल्यामुळे भाजपला जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवणे सोपे झाले होते.

वडवळ नागनाथ गटातून विजयी झालेले सुधाकर श्रंगारे यांच्या रूपाने पक्षाला लोकसभेचा उमदेवार विनायकराव पाटील यांनी मिळवून दिल्यामुळे प्रचंड मताधिक्याने विजय मिळाला. चाकूर नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता होती, भाजपकडे फक्त चार नगरसेवक होते, बहुमत नसतानाही विनायकराव पाटील यांनी करिष्मा दाखवत नगरपंचायतीमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष भाजपचा केला. बाजार समितीच्या निवडणुकीत विजय मिळविला.

पक्ष वाढीसाठी केलेल्या कामामुळे २०१९ च्या निवडणुकीत पक्षाने विनायकराव पाटील यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात भाजपचे दिलीपराव देशमुख व आयोध्या केंद्रे यांनी बंडखोरी केल्यामुळे झालेल्या मतविभाजनात त्यांना पराभव स्विकारावा लागला. पक्षाने याची दखल घेणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष करीत दिलीपराव देशमुख यांना जिल्हाध्यक्षपद बहाल केले.

पदाधिकारी निवडण्यातही विश्वासात घेतले गेले नसल्यामुळे नाराजी होती. तसेच आमदार बाबासाहेब पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यागटाकडे गेल्यामुळे आपणास विधानसभेची उमेदवारी मिळू शकत नाही हे लक्षात येताच विनायकराव पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेशाचा निर्णय घेतला आहे त्यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार आहे.

त्यामुळे मतदारसंघात वेगळे चित्र पहावयास मिळणार आहे. राज्याच्या राजकारणातील उलथापालथ व जिल्ह्यातील भाजपचे राजकारण यामुळे भाजपचे सच्च्ये कार्यकर्ते व मतदार संभ्रमावस्थेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT