Drone esakal
मराठवाडा

Drone : मध्यरात्रीनंतर गेवराईतील ग्रामीण भागात घिरट्या घालणारे ड्रोन कुणाचे? महसूल, पोलीस प्रशासन म्हणतात....

गेवराई शहरातील नविन वसाहत आणि ग्रामीण भागातील राजपिंपरी, पांढरवाडी गावखेड्यात मागील १५ दिवसापासून मध्यरात्रीनंतर ड्रोन घिरट्या घालत आहे.

भास्कर सोळंके

जातेगाव (जि. बीड) - मागील १५-२० दिवसापासून गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी परिसरात तसेच ग्रामीण भागात आणि शहरातील मुख्य वसाहत ठिकाणी ड्रोन रात्र-बेरात्र घिरट्या घालत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोदावरी नदीच्या काठावरील पंचाळेश्वर, राक्षसभूवन, सावळेश्वर तसेच गेवराई शहरातील नविन वसाहत आणि ग्रामीण भागातील राजपिंपरी, पांढरवाडी गावखेड्यात मागील १५ दिवसापासून मध्यरात्रीनंतर ड्रोन घिरट्या घालत आहे. मात्र, ड्रोन कोणाचे अन् कशामुळे घिरट्या घालत आहे. याची माहीती उपलब्ध झालेली नाही. मग घिरट्या घालणारे ड्रोन कुणाचे हा एक कुतूहलाचा विषय बनला आहे.

दरम्यान, गेवराई शहरात व ग्रामीण भागात फिरणारे ड्रोन हे पोलीस प्रशासनाचे नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ यांनी सांगीतले. तर काही दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ड्रोन फिरले असल्याची माहीती असून, मात्र, सद्यपरिस्थितीत फिरणारे ड्रोन महसूल विभागाचे नाही. असे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी सांगीतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT