मानवत (जि.परभणी) : मागील पाच दिवसांत शहरात नऊ कोरोना रुग्ण (Corona) आढळले असून तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल ( IAS Anchal Goyal) यांनी दिले. शहरात प्रभागनिहाय लसीकरण केंद्र उभारून कोणत्याही परिस्थितीत आठ दिवसांत लसीकरण पूर्ण करण्याची सूचना गोयल यांनी केली. शहरातील नगरपरिषद (Manwat) सभागृहात बुधवारी (ता.सहा) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात गोयल यांनी मार्गदर्शन केले. मानवत शहरात १ ते ५ ऑक्टोबर या काळात नऊ रुग्णांची नोंद झाली. यात जिजाऊ नगर येथील एकाच कुटुंबातील सात सदस्यांच्या समावेश आहे. यामुळे जिल्हाधिकारी गोयल यांनी मंगळवारी रात्री तातडीने आदेश काढून शहरातील गर्दीचे ठिकाणे बंद करण्याचे आदेश दिले. यात आठवडी बाजार, धार्मिकस्थळे, शाळा, विवाहा सोहळे, खेळाची मैदाने १६ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
यामुळे शहरातील देवी मंदिर येथील नवरात्र उत्सव साजरा केला जाणार नाही. बुधवारी सकाळी अकरा वाजता नगर परिषद सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी गोयल यांनी जिजाऊ नगर येथे भेट दिली. बैठकीस उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरजोगे, तहसीलदार डी. डी. फुपाटे, नगराध्यक्ष एस. एन. पाटील, उपनगराध्यक्ष राणी लाड, तालुका आरोग्य अधिकारी रेहान शेख, वैद्यकीय अधीक्षक डॉ.नरेंद्र वर्मा, मुख्याधिकारी जयंत सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे आदी उपस्थित होते. शहरातील लसीकरण मोहिमेचा आढावा घेत त्यांनी लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचना केली. सध्या दोन केंद्रांवर लसीकरण केले जाते. यात वाढ करून नऊ प्रभागात नऊ लसीकरण केंद्र उभारणार असून प्रत्येक केंद्रावर ३०० या प्रमाणे दररोज तीन हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. दररोज ६०० चाचण्या करणे, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केअर सेंटर सुरू करण्यासाठी पूर्वतयारी करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत सामावून घेणे, आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
स्वॅब न घेता रिपोर्ट पॉझिटिव्ह
मंगळवारी शहरातील देवी मंदिर परिसरातील एका २२ वर्षीय युवक मंगळवारी लस घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात गेला होता. त्याचा स्वॅब न घेता कर्मचाऱ्यांनी टार्गेट पूर्ण करण्यासाठी फक्त नाव चाचणी यादीत टाकण्यात आले. बुधवारी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर त्याला धक्का बसला. या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. याबाबत संबंधित युवकाने तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता सदरील प्रकार गंभीर असून कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.