पाथरी (जि. परभणी) - ‘सबका मालिक एक है’ असा राष्ट्रीय संदेश देणारे थोर संत श्री साईबाबा यांचे जन्मस्थान असलेले पाथरी (जि. परभणी) येथील मंदिर पाहण्यासाठी व साई दर्शनासाठी भक्तांचा ओढा वाढत चालला आहे. गेल्या वर्षभरात या मंदिराला जवळपास दोन ते अडीच लाख भाविकांनी भेट दिली आहे. यात परदेशी भविकांचाही समावेश आहे. एक तीर्थक्षेत्र म्हणून पाथरी नावारूपास येत आहे.
शिर्डी येथील साईबाबा संस्थांचे तत्कालीन विश्वस्त विश्वास बाळासाहेब खेर (मुंबई) यांनी अनेक सबळ पुराव्यांच्या आधारे साईबाबांचे जन्मस्थान पाथरी (जि. परभणी) असल्याचे जगासमोर आणले. साईबाबा हे दत्ताचे अवतार होते. याचा उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृतातही आहे. श्री साईबाबा संस्थानच्या १९७२ मध्ये प्रकाशित पुस्तकातही याचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये स्वतः साईबाबांनी त्यांचे परमभक्त श्री म्हाळसापतींना आपण पाथरी येथे जन्म घेतल्याचे नमूद आहे. या आधारावरून विश्वास खेर हे १९७५ मध्ये पाथरीत आले. ग्रामस्थांशी संवाद साधताना पुरावा एकत्र जोडून पाथरी हीच साईबाबांची जन्मभूमी असल्याचे त्यांनी सिद्ध केले.
हेही वाचा - महिला रुग्णांसाठी गुड न्यूज : कोरोनाग्रस्तांसाठी स्वतंत्र वार्ड
विजयादशमीला मंदिराची पायाभरणी
ता. एक जून १९७८ रोजी साईबाबांचे वंशज प्रा. र. म. भुसारी यांनी साईस्मारक समिती स्थापन केली. ता. १३ ऑक्टोबर विजयदशमीच्या मुहूर्तावर मंदिराचे भूमिपूजन करून मंदिर बांधकामाला सुरवात केली. यावेळी खोदकाम करताना दोन कमानी व एक भुयार आढळले. त्यात जाती, मारुती व खंडोबाच्या मूर्ती पूजेची उपकरणे आदी वस्तू सापडल्या. ता. १९ ऑक्टोबर १९९९ ला मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
साईबाबांची पंचधातूची मूर्ती
मंदिरात विराजमान असलेली श्री साईबाबांची मूर्ती पंचधातूची असून, शिर्डी येथील मूर्तीचे शिल्पकार श्री तालीम यांच्याच मुलाने पाथरीच्या मंदिरातील मूर्ती बनवली आहे. हादेखील एक योगायोगच म्हणावा लागेल. साई मंदिर परिसरात समितीच्या वतीने वीस खोल्याचे भक्त निवास उभारले असून त्यात चार खोल्या वातानुकूलित आहेत. वाजवी दरात भाविकांना दिल्या जातात.
हेही वाचलेच पाहिजे - नांदेड - लॉकडाउननंतर ‘कोरोना’चा खासगी ‘डोस’ सोसेना
असा आहे मार्ग
पाथरी येथे येण्यासाठी परभणी शहरातून बस तसेच खासगी वाहने जातात. औरंगाबादहून पूर्वेकडे पाथरी हे गाव गेवराई, माजलगाव मार्गे १८४ किलोमीटर अंतरावर आहे; तसेच रेल्वे मार्गाने मानवत रोड या रेल्वेस्थानकावर उतरून तेथून खासगी वाहने किंवा बसने पाथरी येथे जाता येते.
(संपादन - अभय कुळकजाईकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.