tarke 
मराठवाडा

कुस्तीसोबत मानापमानाच्या नाट्याने गाजली स्पर्धा

शिवचरण वावळे

नांदेड ः श्री क्षेत्र माळेगावची खंडोबा यात्रा तशी अनेक कारणांसाठी प्रसिद्ध  आहे. कुस्‍त्‍यांच्‍या दंगली आणि ठसकेबाज लावण्यांसोबतच या यात्रेत महाराष्‍ट्रासह विविध राज्यातील मात्तबर पहिलवान कुस्‍तीसाठी मोठ्या संख्येने सहभागी होत यात्रेची शोभा वाढवतात. शुक्रवारी (ता.२६) कुस्त्यांची रंगत चांगली होणार असे वाटत असतानाच कुस्त्यांचा फड सुरू होण्यापूर्वीच ‘दाजी विरुद्ध मेव्हणा’ असा सामना रंगला. त्यामुळे माळेगाव केसरी ठरलेले ‘अच्युत टरके’ यांच्यापेक्षा दाजी-विरुद्ध मेव्हणाच्या मानापमानाच्या नाट्यमय घडामोडीमुळे शुक्रवारचा दिवस चांगलाच गाजला.
‘अश्‍वां’च्या ‘ॲनिमल आॅफ द शो’ या स्पर्धेनंतर त्याच मैदानावर दुपारी कुस्त्यांची दंगल सुरू होणार म्हणून मानाचे पहिलवान कुस्तीच्या मैदानात उतरले होते. काही वेळात कुस्त्यांची दंगल सुरू होणार होती. परंतु, माळेगाव यात्रेच्या जणू मानापमानाच्या परंपरेनुसार विविध कारणाने धुमसत असलेल्या दाजीविरुद्धचा राजकीय वाद उफाळून आला आणि आमदार श्‍यामसुंदर शिंदे विरोधात खासदार प्रताप पाटील चिखलीकर समर्थक यांच्यात कलगीतुरी आणि धक्काबुक्की झाल्याने दिवसभर कुस्तींच्या दंगलीपेक्षा दाजी विरुद्ध मेव्हणा अशाच राजकारणाची व मानापमानाची यात्रेत चर्चा सुरू झाली.

अच्‍युत टरकेला माळेगाव केसरीचा बहुमान 
कुस्तीच्या अटीतटीच्‍या सामन्‍यात लोहा तालुक्‍यातील किवळा येथील कुस्‍तीगीर ‘अच्‍युत टरके’ यांनी माळेगाव केसरीचा बहुमान पटकावला आहे. या स्‍पर्धेत उपविजेते ठरलेले पुणे येथील गणेश जाधव यांच्या कुस्तींची फारशी चर्चा झालीच नाही. त्याऐवजी पूर्वीपासून हेवे दाव्यांचे राजकारण आणि मानापमानाचीच सर्वात जास्त चर्चा झाल्याचे दिसून आले. 

व्यवस्था प्रशासनाची अन् पकड राजकारण्यांची
माळेगाव यात्रा ही जिल्हा परिषद व ग्रामपंचायत प्रशासनामार्फत सर्व व्यवस्था केली जाते. परंतु, कुठलीही यात्रा ही राजकीय वरदहस्ताशिवाय चांगली होऊच शकत नाही. असा सर्वांचा विश्वास असल्याने जिल्हा परिषद प्रशासनावर राजकीय पुढारी वरचढ ठरत आल्याने माळेगाव यात्रेत नेहमीच हेवे दाव्यांचे राजकारण येते आणि त्यातून जणू काय ही परंपराच झाल्याचे दिसून येते. 

हे ठरले उपविजेते
द्वितीय क्रमांकाची कुस्‍ती कंधार तालुक्‍यातील वाकरड येथील मल्‍ल योगेश मुंडकर यांनी जिंकली. तर परभणीचा मदन गोडबोले उपविजेता ठरला आहे. तृतीय क्रमांकाची कुस्‍ती बामणी येथील परमेश्‍वर जगताप यांनी जिंकली तर अंबेजोगाईचा चंद्रकांत करे उपविजेता ठरला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : या निवडणुकीत आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी लढतोय : संजय राऊत

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

Holiday Fun Ideas : सुट्टीच्या दिवशी घरी करा 'ही' 5 हलकी-फुलकी कामे, मूड होईल एकदम फ्रेश

SCROLL FOR NEXT