कोरोना केअर सेंटरमध्ये योगाचे धडे 
मराठवाडा

हिंगोलीत कोरोना सेंटरमध्ये महिलांना योगाचे धडे- डॉ. नंदिनी भगत

राजेश दार्वेकर

हिंगोली : येथील लिंबाळा भागातील महिला कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर राहण्यासाठी योगाचे धडे दिले जातात. त्यामुळे हे कोरोना केअर सेंटर राज्यात अव्वल ठरले असल्याचे येथील उपचार करणाऱ्या डॉ. नंदिनी भगत यांनी सांगितले.

जिल्ह्यात मागील वर्षी कोरोना संसर्ग वाढल्याने रुग्णांसाठी ठिकठिकाणी कोरोना केअर सेंटरची स्थापना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या संकल्पनेतून करण्यात आली. यामध्ये महिला रुग्ण देखील आढळून येण्याचे प्रमाण वाढत असल्याने महिलांसाठी देखील लिंबाळा येथील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहात महिला कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. हे सेंटर निसर्गरम्य वातावरणात उभारण्यात आल्याने या ठिकाणी कोरोना बाधित महिला रुग्णावर महिला कर्मचाऱ्यांकडून २४ तास सेवा दिली जात आहे.

हेही वाचा - उठसूट राजद्रोहाच्या कायद्याचे अस्त्र उपसून टीकाकारांचा आवाज दाबून टाकण्याचे प्रयत्न सध्या होत आहेत.

जिल्ह्यात कोरोना बधितांची आकडेवारी कमी होत आहे. कोरोना लढाई जिंकण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपययोजना केल्या आहेत. यामध्ये गृह विलगिकर्णाची सुविधा नसली तरी रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्यास तातडीने कोविड सेंटरमध्ये भरती करुन उपचार सुरु केले जात आहेत. त्यामुळे रुग्ण संख्येचे प्रमाण काहीअंशी तरी घटत आहे. महिला कोविड सेंटरमध्ये औषधा सोबत रुग्णांना मानसिक व भावनिक आधार दिला जात आहे. येणाऱ्या महिला रुग्णाचे काही नातेवाईक दुसरीकडे अतिगंभीर परिस्थितीत असतात. त्यामुळे त्या ऑलरेडी खूप ढासळलेल्या मनस्थितीत असतात. अशा वेळी त्यांना नुसती औषधी देऊन चालणार नाही तर प्रेमाची आपुलकीची गरज असते. याच आधारावर महिला कोरोना सेंटर सुरू असल्याचे डॉ. नंदिनी भगत यांनी सांगितले.

येथील भरती झालेले रुग्ण सुट्टीच्या वेळेस आपले मनोगत व्यक्त करीत असतात. त्यामुळे काम करण्यास प्रेरणा मिळते. याठिकाणी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरुवाडे, वेळोवेळी भेटी देऊन मार्गदर्शन करीत असतात. आणि त्यांचे सहकार्य मिळते. त्याच जोरावर महिला कोविड केअर सेंटर आपली उत्कृष्ट सेवा बजावत आहेत.

येथे क्लिक करा - यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा ३४७ वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक शिवकालीन 'सुवर्ण होनाने' होणार: संभाजीराजे

येथील कोविड रुग्णांना शुद्ध हवेतील ऑक्सिजन मिळावे यासाठी प्राणायाम, योगासने व्यायाम आदी प्रकारातील धडे देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळेच येथील रुग्ण लवकर बरे होऊन घरी जात आहेत. सुरुवातीला न येणारे रुग्ण नंतरच्या काळात प्रांगणात प्राणायाम साठी येऊ लागल्या. त्यामुळे त्यांना प्राणायाम करण्यामागचे महत्त्व पटवून दिले जात आहे. कोरोना मुक्त झाल्यानंतर त्याचा आनंद घेऊन बाहेर पाऊल टाकतात. यावेळी येथील परिचारिका, डॉक्टर यांना सेवा केलेले फळ मिळते. असे डॉ. नंदिनी भगत यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

IND vs AUS : इंडियाला धक्का; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, कारण...

Cabinet Meeting: नॉन क्रिमिलेयरची मर्यादा, पत्रकारांसाठी महामंडळ... मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

SCROLL FOR NEXT