उस्मानाबाद : जिल्ह्यातील यंग ब्रिगेड सध्या राष्ट्रीय तसेच राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवताना दिसत आहे. शरण पाटील (Sharan Patil) यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. तर यापूर्वीही जिल्ह्यातील यंग ब्रिगेडने राजकारणाच्या सर्वोच्च पदावर काम करीत आहेत. भविष्यात त्यांना कसे यश मिळते, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात यशस्वी घौडदौड करणारी मंडळी प्रामुख्याने ग्रामीण भागातून येत असल्याचे चित्र राजकीय इतिहासात पाहायला मिळते. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांनी ग्रामपंचायत सदस्यांपासून ते केंद्रीय मंत्रीपद मिळविण्यापर्यंतचा त्यांचा इतिहास आहे. या शिवाय स्वर्गीय आर. आर. पाटील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचीही उदाहरणे आहेत. (Young Leaders Of Osmanabad Active In State Politics)
मात्र उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातून असे नेतृत्व उदयाला आले नाही. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळले. मात्र त्यानंतर जिल्ह्यातून राष्ट्रीय अथवा राज्याच्या राजकारणात सर्वोच्च पद मिळविता आलेले नाही. दरम्यान गेल्या आठवड्यात शरण पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी गेली पाच वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले. सभागृहातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीवरही त्यांनी काही काळ काम केले. त्यानंतर आता नुकतीच काँग्रेसच्या यंग ब्रिगेडची प्रदेश कार्यकारिणी मतदानाच्या स्वरुपाने जाहिर झाली आहे. पक्षाचे सदस्य असणारे निवडणुकीत मतदान करतात. यातून पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्यात अनेक दिग्गज या निवडणुकीच्या मैदानात होते. त्यात शरण पाटील यांनी बाजी मारत युवक काँग्रेसचे (Yuvak Congress) प्रदेशाध्यक्षपद मिळविले आहे.
राज्यातील युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यात काम करण्याची संधी मिळणार आहे. भविष्यात त्यांचे कार्य त्यांना उच्च पातळीवर घेऊन जाऊ शकते. त्यासाठी त्यांना मोठी मेहनत करावी लागणार आहे. या शिवाय कृष्णा तवले (Krushna Tawale) या सामान्य शेतकरी कुटुंबातील युवकानेही काँग्रेसच्या राष्ट्रीयस्तरावर झेप घेतली आहे. त्यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड झाली आहे. देशाच्या राजकारणात राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून कृष्णा काम करीत आहेत. गेल्या वर्षात त्यांना हे पद मिळाले आहे. त्यांच्या कामगिरीकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष असणार आहे. भविष्यात एक मोठा नेता म्हणून नावलौकिक मिळविण्याची त्यांना संधी मिळाली आहे. त्यासाठी मेहनत घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध करावे लागणार आहे.
युवतीची भरारी
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या (NCP) प्रदेशाध्यक्षा म्हणून सक्षणा सलगर (Sakshana Salgar) काम करीत आहेत. शिवाय त्यांनी गेली पाच वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करीत आहेत. स्वतःच्या जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे. सभागृहात आपल्या वक्तृत्वाने सत्ताधाऱ्यांना धाऱ्यावर धरून कामे करून घेतली आहे. प्रदेशाध्यक्षा म्हणून त्या विविध जिल्ह्यात जाऊन युवतींचे संघटन करीत आहेत. एक मुलगी म्हणून घराबाहेर पडण्यास कुटुंबातील सदस्यांचा कायम विरोध असतो. मात्र सक्षणा यांनी यावर मात करीत राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सक्षणांच्या कामाची दखल घेतली. स्वतः खासदार पवार यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या पाडोळी जिल्हा परिषद गटात येऊन त्यांनी केलेल्या कामाची पाहणी केली. त्यांचे कौतुक केल्याने त्यांचे नाव आता राज्याच्या राजकाणात सातत्याने चर्चेत येत आहे. सक्षणा यांना त्यांच्या कामात सातत्य ठेवावे लागणार आहे. जिल्ह्यातील नेत्यांना एकत्र करून एकसंघ ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. शिवाय राज्यातील युवतींची संघटनात्मक बांधणी करून जास्तीत-जास्त युवतींना पक्षकार्यात सहभागी करून घेण्याचे कार्य सक्षणा यांना पार पाडावे लागणार आहे. त्यांच्या या कार्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. राज्यातील एक यशस्वी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भविष्यात त्या कशा प्रकारे काम करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक वर्षानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील यंग ब्रिगेडचा राज्य तसेच राष्ट्रीय राजकारणात बोलबाला पाहायला मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.