उदगीर, (जि. लातुर) - येथील संभाजीनगर भागात राहणाऱ्या एका २५ वर्षीय युवकाची लैंगिक आजाराबाबतची माहिती काढून त्यास ब्लॅकमेल करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना १९ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली होती. मयत युवकाने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारे व मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नऊ जणांविरुद्ध आत्महत्या प्रवृत्त करणे व ॲट्रॉसिटी अंतर्गत शुक्रवारी (ता. २२) रात्री ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील संभाजीनगर भागात राहणारा विक्रम राजेंद्र बलांडे (२५) याची लैंगिक आजाराची माहिती आरोपी प्रसाद मोरे, शैलेश मारवाडे, रणवीर नटकरे, कौस्तुभ पवार, अभिषेक सताळे, अरविंद खोलगाडगे, सचिन खोलगाडगे, ममता खोलगाडगे, अमोल कचरे रा. सर्व उदगीर यांनी फेसबुक, युट्युब, गुगल हॅक करून त्याची खाजगी माहिती काढून त्यास ब्लॅकमेल करून त्याची बदनामी केली.
यामुळे विक्रम राजेंद्र बलांडे याने १९ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री स्वतःचे राहते घरी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने स्वतःच्या हस्ताक्षरात चिट्ठी लिहून ठेवल्याने त्याची माहिती आईला प्राप्त झाली. याबाबत मयताची आई सत्यशीला राजेंद्र बलांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री वरील अरोपी विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे व ॲट्रॉसिटी अंतर्गत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.