youth move towards silk farming agri business textile industry demand of silk Sakal
मराठवाडा

Sericulture : तरुणांचा वाढतोय रेशीम शेतीकडे कल; बंगलोर व सुरत बाजारपेठेत मागणी

शासकीय अनुदानाचा फायदा; अनेकांना सापडला आर्थिक प्रगतीचा मार्ग

रामदास साबळे

केज : निसर्गाचा लहरीपणा त्यातच सिंचन सुविधांचा अभाव व वाढता शेती उत्पादन खर्च यामुळे शेती व्यवसाय हा परवडेनासा झाला आहे. अशा बदलत्या परिस्थितीत कोरडवाहू शेतीत शेतकरी पारंपारिक पिकाऐवजी शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून तुती लागवड करून रेशीम शेतीकडे वळल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात तुतीची लागवड झाली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोषाला तालुक्यात चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. खासगी व्यापारी रेशीम कोषाची खरेदी करत असल्याने रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर चांगला भाव मिळत आहे.

रेशीम कोषांवर प्रक्रिया करणारा उद्योग होळ येथे तरूण शेतकऱ्याने उभारल्याने या ठिकाणी तयार होणाऱ्या उत्तम दर्जाच्या रेशीम धाग्याला बंगलोर व सुरत सारख्या रेशीम कापड उद्योग असलेल्या बाजारपेठेत मागणी वाढली आहे.

तालुक्यात सिंचनाच्या सुविधांचा अभाव असणाऱ्या भागातील शेतकऱ्यांचा रेशीम शेती करण्याकडे कल दिवसेंदिवस वाढत जात आहे. पूर्वीची पारंपरिक पद्धतीने शेती करणे बदलत्या काळात खर्चिक बनत चालले आहे.

यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च व मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ लागत नसल्याने शेती व्यवसाय परवडेनासा झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी कापसाचे उत्पादन घेत असल्याने तालुक्यात कापसाची मोठी बाजारपेठ निर्माण झाली होती.

मात्र मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या कापसासारख्या नगदी पिकावर बोंड अळी, करपा व लाल्या रोगांचा प्रादुर्भाव आल्याने उतारावर परिणाम झाला आहे. परिणामी कापूस उत्पादन करताना येणारा कीटकनाशके यांचा खर्च भरमसाट वाढल्याने हे पीक परवडेनासे झाल्याने कापसाचे क्षेत्र घटले आहे.

अशा परिस्थितीत या भागातील शेतकरी शेती व्यवसायाला जोड उद्योग म्हणून रेशीम शेती करण्याकडे वळला आहे. तालुक्यात आडस, लाडेवडगाव, जानेगाव, जवळबन, कळमआंबा, होळ,

युसूफवडगाव व आंधळेवाडी या भागात रेशीम शेती उत्पादक शेतीगट स्थापन करण्यात आले आहेत. शासनाच्या कृषी विभागाकडून रेशीम उत्पादक शेतीगटांना तुती लागवड व त्यासाठी लागणाऱ्या शेडसाठी शासकीय अनुदान दिले जात आहे. याकरिता शेतकऱ्यांना केवळ श्रम करून अत्यल्प खर्च करावा लागतो.

रेशीम कोषापासून मिळणारी उत्पादने

एक किलो रेशीम धागा तयार करण्यासाठी सात किलो रेशीम कोष लागतो. रेशीम कोषापासून धागा तयार करताना त्यातून सीट, जिल्ली हे टाकाऊ मटेरिअल निघते. या टाकाऊ सीट वस्तूपासून चीन देशात उबदार ब्लँकेट व लहान बाळांना वापरात येणारा कपडा तयार होतो तर जिल्लीपासून वाहनांच्या टायरमध्ये वापरण्यात येणारा धागा बनतो.

दोन एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करून चांगल्या प्रतिचे कोष उत्पादित केल्यास वर्षाकाठी उत्पादन खर्च वजा जाता सरासरी सात-आठ लाख रूपयांचे उत्पन्न हमखास मिळते. तर, तेजीत चांगला भाव मिळाल्यास हेच उत्पादन दहा लाखांपर्यंत जाते. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव दिला पाहिजे.

— ओमकार शेळके,रेशीम उत्पादक शेतकरी, आडस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहलीसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, आई-वडिलांसह मुलगा-मुलगी अपघातात जागीच ठार; गाय आडवी आली अन्..

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध थांबवू... डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही; मृतांबद्दल दुःख व्यक्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ‘काम करणारा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा झाली यशस्वी

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT