टाकरवण : स्मार्टफोनवर ऑनलाइन जुगारांचा सुळसुळाट सुरू आहे. स्मार्टफोनवर चालणाऱ्या ऑनलाइन जुगारांकडे अनेकजण आकर्षित होत आहेत. या प्रकारात नोकरदार, व्यावसायिकांचा समावेश आहेच. शिवाय आता शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थीही या जुगाराकडे वळल्याने घरबसल्या खेळला जाणारा जुगार तरुणांना बेघर करत आहे.
इंटरनेटचा वापर करून मोबाइल, लॅपटॉपवरून कुठेही, केव्हाही सहजपणे जुगार खेळला जात आहे. ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाइन गेमच्या नावाखाली जुगाराचा खेळ खेळला जात असल्याचे अनेकवेळा निदर्शनास येते. या खेळात विशेष करून युवा व महाविद्यालयीन विद्यार्थी जाळ्यात ओढले जात असल्याचे समोर आले.
इंटरनेटच्या विश्वात अनेक मोबाइल अॅप्स आहेत. यातील काही अॅप्स गेमिंगच्या नावाखाली चालतात. त्यातील काही अॅप्सद्वारे ऑनलाइन जुगार खेळला जातो. अॅप्स मोबाइलमध्ये डाउनलोड करणाऱ्या प्रत्येकाला त्याची माहिती भरावी लागते.
यात नाव व मोबाइल क्रमांक आदींचा वापर करून पैशांचा जुगार खेळण्यासाठी बँक खाते क्रमांक, बँकेचा आयएफसी कोड अथवा इतर ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी असलेले खाते जोडण्यासाठी सांगितले जाते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावर खात्री करण्यासाठी संदेश येतो.
ओटीपी नोंदविल्यानंतर नोंदणी करणाऱ्याचे बँक खाते अॅप्सला जोडून ते सुरू होते. त्या खात्यावर पहिल्यांदा प्रोत्साहनपर काही पैसे पाठविले जातात, मग जुगाराचा खेळ सुरू होतो. अॅप्समध्ये पैसे भरण्यासाठी व काढण्यासाठी पर्याय दिलेले असतात.
अशा प्रकारे ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांची संख्या सध्या वाढली आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
ऑनलाइन मार्केटिंगमुळे घरबसल्या सर्व पोच होत आहे. अशातच बुद्धीचा खेळ म्हणून प्रचलित असणाऱ्या अनेक अॅप्सने शहरी भागासह ग्रामीण भागांतही शिरकाव केला आहे. तरुणांना आकर्षित केल्याने तरुण या विळख्यात अडकत आहेत. यात अनेकजण कंगाल झाले आहेत. सुरवातीला हा खेळ खेळण्यासाठी आगाऊ रक्कम (बोनस) दिला जातो. यानंतर तरुण आकर्षणापोटी लाखो रुपयांना चुना लागून बरबाद होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.