file photo 
मराठवाडा

झेडपीच्या सत्तेत महाविकास आघाडी ! 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड: जिल्हा परिषदेच्या कारभाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने मंगळवारी (ता.२१) अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया होणार आहे. अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव सुटल्याने सत्ताधारी कॉंग्रेसच्या एकून पाचपैकी दोन प्रमुख दावेदारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राज्यात उदयास आलेल्या महाविकास आघाडीचा जिल्हा परिषदेत कॉंग्रेसला फायदा होणार असला तरी अवघ्या दहा जागांवर सत्तेत निम्मा वाटा मिळालेल्या राष्ट्रवादीत सस्पेन्स कायम असून शिवसेनेत मात्र उत्सुकता आहे. 

जिल्हा परिषदेच्या सत्ताकरणामध्ये महाविकास आघाडीपर्व जवळपास निश्चित मानले जात आहे. संख्याबळाचे गणित बाजूला ठेवून काँग्रेसने दहा जागांवर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्ष, तीन समित्यांचा कारभार सोपवून सत्तास्थापन केली. संभाव्य काळातील राजकीय गणित जुळविण्यासाठी विद्यमान अध्यक्षा शांताबाई जवळगांवकर यांच्या माध्यमातून आमदार माधवराव जवळगांवकर यांची विधानसभेची वाट मोकळी करण्यात आली. त्यानुसार आमदार माधवराव जवळगांवकर यांचा हदगाव विधानसभा निवडणूकीत विजय झाला. कार्यकाळ संपल्याने राज्यस्तरावरुन जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव सुटल्याने सत्ताधारी कॉंग्रेसच्या पाचपैकी संगिता वाडकर, बारड जिल्हा परिषद सर्कल व भोकर विधानसभा मतदारसंघ, मंगाराणी अंबुलगेकर बाऱ्हाळी जिल्हा परिषद सर्कल व मुखेड विधानसभा मतदारसंघ या प्रमुख दावेदारांमध्ये चुरस आहे. 

राष्ट्रवादीच्या गोटात सस्पेन्स वाढला 
अवघ्या दहा जागांवर राष्ट्रवादीला सत्तेत अर्धा वाटा मिळाला असला तरी महाविकास आघाडीच्या फॉर्म्यूल्यामुळे शिवनेना सत्तेत सहभागी होत असल्याने राष्ट्रवादीच्या गोटात सस्पेन्स वाढला आहे. त्यातच सध्या उपाध्यक्षाकडे बांधकाम, वित्त समिती व महिला व बालकल्याण, कृषी-पशुसंवर्धन सभापतीचा कारभार राष्ट्रवादीकडे आहे. अध्यक्षपदासह समाजकल्याण, शिक्षण व आरोग्य या पदांचा कारभार कॉंग्रेसकडे आहे. त्यातच विधानसभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या एकूण चार समर्थकापैकी महिला व बालकल्याण सभापती मधुमती राजेश कुटुंरकर आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तु रेड्डी यांची पदे आता रिक्त होत आहेत.

राष्ट्रवादीच्या कोट्यातून शिवसेनेला वाटा 
राष्ट्रवादीचे चारने संख्याबळ कमी होवून सहावर येवून ठेपले आहे. दूसरीकडे शिवसेनेतही राष्ट्रवादीच्या तुलनेत पडझड झाली आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटाचे चार सदस्य सत्तेत सहभागी होणार नसल्याचे मत जानकारातून व्यक्त होत असल्याने शिवसेनेचे संख्याबळही सहावर येवून ठेपले आहे. अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव सुटल्याने उपाध्यक्षपदाची माळ खुल्या प्रवर्गाच्या गळ्यात घालण्यात येईल, अशी चर्चा असली तरी दहा वर्षापासून पदावर दावा असलेल्या राष्ट्रवादीच्या तावडीतून उपाध्यक्षपद काढण्यात कॉंग्रेस कितपत यशस्वी होणार हे मंगळवारी (ता.२१) समोर येणार आहे. राष्ट्रवादीच्या तुलनेत सहा संख्याबळ असलेल्या शिवसेनेचा सत्तेत वाटा किती याची उत्सुकता कायम असली तरी काँग्रेस आपला सत्तेचा वाटा कायम राखून राष्ट्रवादीच्या कोट्यातील तीनपैकी एक सभापती पद शिवसेनेकडे सोपवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

विषय समित्यावरच ठरणार दावेदार 
यामध्ये कृषी व पशुसंवर्धन खात्यासाठी दिलीप बास्टेवाड किंवा बबन बारसे तर महिला व बालकल्याण खात्यासाठी माजी आमदार सुभाष साबणे यांच्या स्नुषा शुभांगी साबणे एकलारा सर्कल, मुखेड विधानसभा मतदारसंघ व राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले अनिल पाटील खानापुरकर यांच्या पत्नी अनुराधा पाटील खानापुरकर सर्कल देगलूर विधानसभा मतदारसंघ या प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला सत्तेत वाटा किती व कोणत्या समित्या मिळणार यावरुन दावेदार ठरणार आहेत. तर दूसरीकडे राष्ट्रवादीच्या गोटात उपाध्यक्ष पदापासून विषय समित्यांमधील वाट्यावरुन सस्पेंन्स वाढला आहे. जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या सत्तावाटपा संदर्भात नांदेडमध्ये दाखल होताच कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता.तीन) सायंकाळी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या सत्ताकरणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील हवा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT