ZP School esakal
मराठवाडा

ZP School: गुरुजी, गणवेश कधी मिळणार? विद्यार्थ्यांना उत्तरे देताना शिक्षकांच्या नाकीनऊ

Maharashtra News: गणवेशापासून वंचित राहिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक आता दररोज ‘गुरुजी! गणवेश कधी मिळणार? असा प्रश्न विचारू लागले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Sambhajinagar News: यंदा शासनाने मोठा गाजावाजा करत सुरु केलेली एक राज्य एक गणवेश योजना अजूनही चर्चेत आहे. शाळांचे पहिले सत्र संपले, स्वातंत्र्यदिन झाला, तरीदेखील जिल्ह्यातील एकाही शाळेला मोफत गणवेश मिळालेला नाही. गणवेशापासून वंचित राहिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक आता दररोज ‘गुरुजी! गणवेश कधी मिळणार? असा प्रश्न विचारू लागले आहे. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षकांच्या मात्र नाकी नऊ येत आहेत.

‘एक राज्य एक गणवेश’ या उपक्रमांतर्गत एक नियमित गणवेष आणि एक स्काऊट गाइडसाठीचा गणवेश असे प्रत्येकी दोन गणवेश देण्यात येणार आहेत.

या दोन्ही गणवेशांचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या समग्र शिक्षण अभियानांतर्गत आणि राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. यंदा सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एकाच रंगाचा गणवेश देण्यात येणार आहे. यासाठी गुजरातच्या कंपनीला कापड पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, अडीच महिने उलटून गेले तरी अद्याप एकाही विद्यार्थ्याला मोफत गणवेशाचा लाभ मिळालेला नाही.

जिल्हा परिषदेच्या शाळांत वाड्यावस्त्यांवरील गरिबांची मुले येत असतात. या विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या मोफत पाठ्यपुस्तक व मोफत गणवेश या दोन्ही योजना उपयुक्त ठरते. या दोन्ही योजनांमुळे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढण्यास मदत होते.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळाली; मात्र मोफत गणवेशाची अजूनही प्रतिक्षा आहे.

दोन ते अडीच महिने झाले तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. अजून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे माप देखील घेण्यात आलेले नाही. तसेच शिक्षण विभागाकडून देखील गणवेश कधी मिळणार? याबाबत स्पष्ट सांगण्यात आलेले नाही. विद्यार्थी दररोज गणवेशाबाबत विचारत आहेत, त्यांना काय उत्तर द्यावे हे शिक्षण विभागाने सांगायला हवे

. — राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT