परभणी ः कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या सद्यस्थितीत एकही अनाथ, एक पालक, एचआयव्ही संक्रमित, दुर्धर आजारग्रस्त बालके शिक्षणापासून अर्थात शैक्षणिक गरजांपासून वंचित राहू नये म्हणून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेने पुढाकार घेतला आहे. यावर्षी एचएआरसी संस्थेतर्फे परभणी जिल्ह्यातील २०० अनाथ, एक पालक, एचआयव्ही ग्रस्त बालकांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे.
याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्यात (ता.नऊ) जुलै सेतु चॅरिटेबल ट्रस्टच्या नेटवर्कमधील एचआयव्ही संक्रमित, अनाथ, दुर्धर आजारग्रस्त व वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला अश्या एकूण ५० मुलांना मौलाना आझाद वाचनालय शेजारी सेतु संस्थेच्या इमारतीत आयोजित कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.
वर्षभर पुरतील इतके साहित्य
दुसऱ्या टप्यात सोमवारी (ता.१३) जुलै रोजी एआरटी विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेणाऱ्या १५० एचआयव्ही संक्रमित एक पालक व अनाथ बालकांना शैक्षणिक किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी एचएआरसी संस्थेतर्फे पहिली ते इयत्ता दहावीतील वंचित बालकांना वर्षभर पुरतील इतक्या वर्गनुसार वह्या, पाटी, पेन्सिल, पेन, रजिस्टर, चित्रकला साहित्य, व्यवसायमाला, पाठयपुस्तक, कंपास, जीयोमेट्री बॉक्स, मास्क इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.
हेही वाचा - नांदेडला पुन्हा हादरा : सोमवारी दिवसभरात ३४ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू, संख्या पोहचली ६५० वर
शैक्षणिक किट करणार सुपूर्द
हे शैक्षणिक किट एआरटी उपचारासाठी येणाऱ्या एचआयव्हीग्रस्त मुलांच्या तारखेनुसार त्यांना सुपूर्द करण्यात येतील असे एआरटी विभागाकडून सांगण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी डॉ. पवन चांडक, राजेश्वर वासलवार, चंद्रकांत अमीलकंठवार, डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ. निलिमा मार्डीकर, अनुराधा बेर्डे, सुरेखा जाधव, विशाल कापरबोइना आणि कर्मचारी उपस्थित होते. यशस्वितेसाठी डॉ.शिवा आयथॉल, चंद्रकांत अमीलकंठवार, राजेश्वर वासलवार, डॉ.आशा चांडक, गोपाल मुरक्या, नेहा मुरक्या, कीर्ती तापडीया आदींनी सहकार्य केले.
शैक्षणिक गरजांसाठी लोकसहभागातून मदत
२०१० पासून एचएआरसी संस्थेतर्फे समाजातील अनाथ, एचआयव्ही संक्रमित व एक पालक, मूकबधिर मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारून या मुलांना वर्षभर लागणाऱ्या शिक्षण व शैक्षणिक गरजांसाठी सर्वतोपरी लोकसहभागातून मदत करत आहे. यावर्षी लॉकडाउनमुळे शाळा जरी बंद असल्यातरी मुले त्यांना आपण देत असलेल्या नावीन्यपूर्ण साहित्यामुळे घरीच हसतखेळत अभ्यास करतील व शिक्षणापासून वंचित देखील राहणार नाहीत. - डॉ. पवन चांडक, अध्यक्ष, एचएआरसी संस्था, परभणी.
(संपादन ः राजन मंगरुळकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.