Red Necked Phalarope Bird esakal
मुक्तपीठ

वाट चुकून आला अन्‌ सहा दिवस थांबला!

सकाळ वृत्तसेवा

-डॉ. सुधीर गायकवाड-इनामदार (sudhir_gaikwad03@yahoo.co.in)

सोमवारचा दिवस होता... आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने दवाखान्यात वेळेवर पोहोचण्याची घाई होती. इतक्यात डॉ. रजनीशचा फोन आला... ‘बर्डिंग ग्रुप बघ पटकन’ म्हणाला. ‘का रे?’ असं विचारत असतानाच, ‘बघ बघ’ म्हणत त्याने फोन ठेवला. रजनीश माझा कॉलेजपासूनच मित्र. छायाचित्रण आणि विशेषतः दुर्मिळ पक्ष्यांचे निरीक्षण आमचा आवडता छंद. गेली दहा वर्षे आम्ही आपापले क्लिनिक सांभाळून देशातील अनेक दुर्गम भागांत फिरून पक्षीनिरीक्षण केले आहे. क्लिनिकला पोहोचून सुरुवातीचे काही रुग्ण तपासून झाल्यावर मोबाईल हातात घेतला. बर्डिंग ग्रुप (Birding Group) पाहिला... पालघरच्या आशीष बाबरेंची (Ashish Babre) पोस्ट. बोईसरला ‘लाल मानेचा फलारोप..’ खरे तर हा पक्षी मी तीन वर्षांपूर्वी उरण येथे पाहिला होता; पण फारच दुरून. छायाचित्रदेखील फारसे चांगले मिळाले नव्हते. त्यामुळे बोईसरला जाण्याची ओढ मनात आकार घेत होती. (Dr. Sudhir Gaikwad Inamdar Article On Red Necked Phalarope Bird bam92)

‘लाल मानेचा फलारोप’ हा उत्तर अमेरिका, युरोप व उत्तर आफ्रिकेतील सागरात राहणारा पक्षी. खरे तर तो हिवाळ्यात उष्ण कटिबंधीय सागरात स्थलांतर करतो.

‘लाल मानेचा फलारोप’ (Red Necked Phalarope Bird) हा उत्तर अमेरिका (America), युरोप व उत्तर आफ्रिकेतील सागरात राहणारा पक्षी. खरे तर तो हिवाळ्यात उष्ण कटिबंधीय सागरात स्थलांतर करतो. हा पावसाळ्यात बोईसरला कशाला आला, या प्रश्‍नाने मनात घर केले. त्यातही हा गडद लालसर मानेच्या रंगात दिसला, म्हणजेच त्याचा विणीचा हंगाम. या हंगामात तो उत्तर ध्रुवात असतो, तो बोईसरला आलाय! म्हणजे उत्तर अमेरिकेतून (North America) उत्तर ध्रुवाला जाताना मार्ग चुकून तो इकडे आला असावा... माझ्या मनाने त्याचा ताबा घेतला होता. हवामानात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की परदेशी पक्ष्यांचे स्थलांतर होते. अति हिमवृष्टीमुळे अन्न मिळण्यास कठीण झाले किंवा थंडी सोसेनाशी झाली, की हिवाळ्यात हे परदेशी (Exotic birds) पाहुणे छोट्यामोठ्या थव्यांनी आपल्याकडे येतात. त्यांच्या मूळ ठिकाणी परिस्थिती पूर्ववत झाली, की परतीच्या मार्गाला लागतात. आपण माणसे एका शहरातून बाजूच्याच शहरात जाताना मार्ग चुकतो, मग हजारो किमीचे अंतर पार करताना हे पक्षी कधी मार्ग चुकत नाहीत का? नक्कीच चुकतात. कधी-कधी भरकटून इप्सित स्थानापेक्षा वेगळ्याच ठिकाणी पोहोचतात. अशांना ‘चुकार मार्गस्थ’ म्हणतात. असे चुकार मार्गस्थ आपल्याकडे आले, की पक्षीमित्र त्यांना बघण्यासाठी अक्षरश: रीघ लावतात.

पक्षीमित्र आशीष बाबरे हे बोईसर येथील खाडीकिनारी पक्षीनिरीक्षण करत असताना त्यांना हा वाट चुकलेला ‘लाल मानेचा फलारोप’ दिसल्याचा फोटो त्याने शेअर केला होता. या परदेशी पाहुण्याला बघण्याची उत्सुकता ताणली जात होती. त्यात एक दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच डॉ. रजनीशचा फोन आला. त्याचा फोन बघून जरा दचकलो. काय सांगतो याची उत्सुकता. तो म्हणाला, ‘‘काम फत्ते... फोटो शेअर करतो म्हणाला आणि फोन ठेवला. क्षणभरातच स्क्रीनवर ‘लाल मानेचा फलारोप’ विणीच्या हंगामातील आकर्षक रंगावस्थेत दिसला. मी त्याच्यासोबत न गेल्याचा पश्चाताप झाला. दिवसभरात आणखी काही मित्रांनी अपडेट्स दिले. दैनंदिन कामाच्या व्यापात उद्या व परवा असे दोन दिवस गेले. शुक्रवारी जाऊ असे ठरवले. वाट चुकलेला पक्षी आहे, कधीही पुढील प्रवासास निघून गेला तर ही धाकधुक अस्वस्थ करत होती.

खरे तर बोईसर मुंबईपासून १३० कि.मी. म्हणजेच किमान साडेतीन तास प्रवास. सकाळी ७ वाजता पोहोचायचे म्हणजे पहाटे ३.३० ला निघावे लागणार याचे गणित मांडून गुरुवारी रात्रीच आशीक बाबरे यांच्याकडून लोकेशन मॅप घेतला. शुक्रवारी पहाटे ठाण्यातील छायाचित्रकार मित्र अमेय भावेसोबत शुक्रवारी पहाटे पहाटे ४ वाजता ठाण्यातून निघालो. सकाळी ७ वाजता बोईसरच्या त्या पाणथळ जागी पोहोचलो. तिथे बरेच पक्षीनिरीक्षक पोहोचले होते. आशीष बाबरे इतक्यातच आले. त्यामुळे विस्तीर्ण पाणथळीत त्या छोट्या पक्ष्याचा शोध घेण्यास फारसे कष्ट पडले नाहीत. सर्वांची धावपळ उडवणारा ‘तो’ पाहुणा तिथंच होता. परतीच्या प्रवासाला जाण्यासाठी लागणारी ऊर्जा तो मिळवत होता. अगदी १५-२० फुटांच्या अंतरावरून त्याचे मनसोक्त निरीक्षण करून समाधान हाईस्तोवर छायाचित्रे काढून घेतली. तो पुन्हा असा येणार नाही, कारण वाट चुकून आपण इकडे आलो आहोत, या अनुभवाने तो समृद्ध झाला असावा. २८ जूनला पाहिल्याची नोंद झाल्यावर हा परदेशी पाहुणा पुढील सहा दिवसच येथे थांबला. असंख्य मुंबईकर पक्षीप्रेमींना भेट देऊन तो परतीच्या प्रवासाला निघून गेला.

Dr. Sudhir Gaikwad Inamdar Article On Red Necked Phalarope Bird bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

SCROLL FOR NEXT