मुक्तपीठ

माझी लंडनवारी

विजय कोलते

ब्रिटिशांची राजवट असल्यामुळे असेल; पण लंडनविषयी भारतीयांच्या मनात आकर्षण असते. काही तरी निमित्त काढून लंडनवारी करायला हवी, असे कित्येकांना वाटते. लेखकही या सुप्त आकर्षणातूनच लंडन पाहायासी गेला.

लंडन महाराष्ट्र मंडळाच्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नुकताच लंडनला गेलो होतो. या संमेलनात लंडनच्या परिसरातील मराठी बांधव सहकुटुंब सहभागी झाले होते. उत्साह प्रचंड होता. साता समुद्राच्या पलीकडे जाऊन लंडनमधील अत्यंत वेगवान, शिस्तबद्ध जीवनाशी एकरूप होत आपले बस्तान बसवण्यासाठी धडपड करणारी मराठी माणसे भेटली आणि अभिमानाने ऊर भरून आला.

सातारच्या महाराजांचे वकील रंगो बापूजी 1816 मध्ये लंडनला जाऊन चौदा वर्षे राहिले होते. त्यांनी मोडी लिपित एक पुस्तकही लिहिले होते. म्हणजे जवळपास दोनशे वर्षे मराठी माणसे लंडनमध्ये स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहेत. 1930 मध्ये गोलमेज परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व न. चिं. केळकर गेले होते. त्या वेळी महाराष्ट्र मंडळ स्थापन करण्याची चर्चा झाली व 1932 मध्ये मंडळाची स्थापना झाली. या स्थापनेला 85 वर्षे पूर्ण झाली. लंडनमध्ये मंडळाची स्वतःची इमारत आहे.

साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांचे सासवड हे गाव. त्यांचे स्मारक शेक्‍सपियरसारखे करण्याचा संकल्प आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचा होता. आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मी स्टॅडफर्ड येथील शेक्‍सपियरच्या स्मारकाला भेट दिली. संपूर्ण गाव आणि परिसर म्हणजे स्मारक अशी विस्तारित कल्पना माझ्या मनात स्पष्ट झाली. आचार्य अत्रे हे शेक्‍सपिअरपेक्षाही विविधांगी होते. शेक्‍सपिअर नाटककार म्हणून जगविख्यात आहेत. अत्रे मात्र नाटककार होतेच; पण याशिवाय निर्माते, लेखक, राजकारणी, पत्रकार, वक्ते, शिक्षक या सर्व क्षेत्रांत होते; पण शेक्‍सपिअर इंग्रजीत असल्याने जगाला समजले. आचार्य अत्रे मराठी असल्यामुळे फक्त महाराष्ट्राला समजले. लंडन येथील साहित्य संमेलनात मी हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला. 1927 मध्ये अत्रे टीडी होण्यासाठी बोटीने लंडनला गेले. परिस्थिती बेताची होती. तेथे जाऊन त्यांनी इंग्रजीचे क्‍लासेस घेऊन उदरनिर्वाह केला. सासवडचे अत्रे लंडनला जाऊन तेथील मुलांना व्याकरणासह इंग्रजी शिकवत होते, आहे का नाही हिंमत? लंडन परिसरात वेम्ली, हॉन्सलो, क्रॉयडॉन, हॅरो, व्हॅटफोर्ड या परिसरात मराठी लोक राहतात. आपल्याकडील अन्नधान्य, भाज्या, फळे बहुतेक सर्वच पदार्थ आता उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून गेलेल्या मराठी माणसाची आबाळ होत नाही.

इंग्लंडमध्ये नुकतीच सार्वत्रिक निवडणूक झाली. कोठेही पोस्टर्स नाही, भाषणे, सभा नाहीत. फेसबुक व व्हॉट्‌सऍप या नवीन साधनांचा उपयोग करून निवडणूक शांतपणे पार पडली. राजकीयदृष्ट्या नागरिक जागरूक आहेत. तेथे राहणाऱ्या भारतीयांना मतदानाचा अधिकार आहे. आपली निवडणूक व तेथील निवडणूक याची तुलना मनात झालीच.

लंडन ब्रिज, टॉवर ब्रिज, स्वच्छ असणारी थेम्स नदी, पार्लमेंटची भव्य इमारत, बकिंगहॅम पॅलेस, पंतप्रधानांचे निवासस्थान, लतादिदी ज्या प्रसिद्ध सभागृहात गायल्या तो अल्बर्ट हॉल या सर्वच प्रेक्षणीय वास्तूंना भेटी दिल्याशिवाय भारतात परत येणे शक्‍य नव्हते. पार्लमेंटसमोर विन्स्टन चर्चिल यांच्याशेजारी महात्मा गांधींचा पुतळा पाहिल्यावर छाती अभिमानाने भरून येते. ब्रिटिशांची भाषा आपल्या लक्षात येत नाही; परंतु हावभावावरून आपल्याला काय हवे आहे, ते जाणतात व मदत करतात. एका थिअटरमध्ये जाण्याची मी संधी घेतली. आतून बाहेर येईपर्यंत माणसाचा संबंध येत नाही, फक्त यंत्रच काम कत असते.

ऑक्‍सफर्ड, केंब्रीजसारखी विद्यापीठे सुमारे आठशे वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करत आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत सप्टेंबर ते डिसेंबर दिवस दुपारी साडेतीन वाजता दिवस मावळतो. एरवी रात्री साडेनऊपर्यंत उजेड असतो व सकाळी साडेचार वाजल्यापासून पुन्हा उजेड दिसतो. लंडन हे जगातील अत्यंत सुंदर शहर आहे; परंतु खरेदीसाठी खूपच महाग आहे. डिझेलपेक्षा पेट्रोल स्वस्त आहे. दूध मात्र स्वस्त मिळते. शेकडो एकरवर गव्हाची शेती पाहण्यास मिळाली. दुभत्या गाईंसाठी व मेंढ्यांसाठी स्वतंत्र कुरणे ठेवलेली आहेत. अशा समृद्ध परदेशामध्ये मराठी लोक राहत असले, तरी ते इतके श्रीमंत नाहीत, की त्यांच्या हिमतीवर फार मोठे खर्चिक कार्यक्रम करू शकतील. म्हणून महाराष्ट्रातील लोक वेळोवेळी मदत करत असतात.

लंडन व युरोपचे वर्णन पु. ल. देशपांडे यांनी "अपूर्वाई' मध्ये फार पूर्वी करून ठेवलेले आहे. आजही ते वर्षानुवर्षे तंतोतंत लागू पडते. लंडनच्या प्रवासात "अपूर्वाई' मी पुन्हा वाचले. लंडनमध्ये फिरताना पु. लं. नी केलेले वर्णन आठवून हसत होतो.
मराठी माणसांनी काहीतरी निमित्त करून लंडनला भेट देण्याचा प्रयत्न करावा, असे मला वाटते. मला दोन वेळा लंडनला जाण्याची संधी मिळाली, मी धन्य झालो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT