मुंबई: लसीकरणाच्या गेल्या 16 सत्रांमध्ये पालिकेच्या रुग्णालयांना पहिल्यांदाच 10 हजारांचा टप्पा गाठण्यात यश आले आहे. उपनगरातील राजावाडी रुग्णालयात सर्वाधिक लसीकरण झाले असून 10 हजार 695 हेल्थकेअर वर्कर्सने लस टोचून घेतली आहे. वाढलेल्या लसीकरणामुळे पालिकेला ही दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, उपनगरातील लसीकरण केंद्रांना हेल्थ केअर कर्मचाऱ्यांनी अधिक पसंती दिली आहे. राजावाडी, बाबा आंबेडकर आणि तिसऱ्या क्रमांकावर केईएम रुग्णालय आहे.
कोविड -19 च्या लसीकरणात सुरुवातीला हेल्थकेअर कर्मचाऱ्यांची कमी नोंद होत होती. पण, आता पालिकेच्या चार लसीकरण केंद्रात लसीकरणाला वेग आला आहे. उपनगरातील राजावाडी आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर (बीडीबीए), किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) आणि बीवायएल नायर रुग्णालयाने या मोहिमेच्या पहिल्या 16 सत्रांमध्ये सुमारे 10 हजारांहून अधिक लाभार्थींना लस टोचण्याचा टप्पा पार केला आहे.
पालिकेने लसीकरणाबाबतीत दिलेल्या आकडेवारीनुसार, राजावाडी रुग्णालयात सर्वाधिक 10 हजार 695 आरोग्य कर्मचारी (हेल्थकेअर वर्कर्स), त्यानंतर बीडीबीए रुग्णालयात 10 हजार 694 केईएम रुग्णालयात 9 हजार 783 आणि बीवायएल नायर रुग्णालयात 9 हजार 600 जणांचे लसीकरण करण्यात आले.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतेक हेल्थकेअर कर्मचारी हे पश्चिम आणि पूर्व उपनगरामध्येच राहतात आणि म्हणूनच त्यांनी घरापासून जवळ असलेल्या केंद्रांना जाणे पसंत केले आहे. शिवाय ही सर्व केंद्रे रेल्वे स्थानकांच्या जवळपास असल्याने लाभार्थ्यांना केंद्रांवर पोहोचणे सोपे जाते.
या लसीकरण केंद्रांवर गेल्या 10 सत्रांमध्ये लाभार्थ्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या दहा सत्रात नायर रुग्णालयात 614 टक्के वाढ झाली आहे. त्यानंतर राजावाडी रुग्णालयात 437 टक्के, बीडीबीए रुग्णालयात 404 टक्के आणि केईएम रुग्णालयात 320 टक्के वाढ झाली आहे.
“सुरुवातीच्या दिवसात लाभार्थी लस घेण्यास टाळाटाळ करत होते ज्यामुळे पहिल्या पाच सत्रात लसीकरणाची संख्या कमी होती. मात्र, नंतर हेल्थकेअर कामगार स्वत: पुढे आले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही लस घेण्याचा सल्ला दिला गेला. शिवाय, यामुळे कोणतेही गंभीर दुष्परिणाम झालेले नाहीत, असे ही एका पालिका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, लसीकरण वाढण्यामागे बरीच कारणे आहेत. ज्यामुळे, या केंद्रांवर ही संख्या जास्त आहे. ही लसीकरण केंद्रे रेल्वे स्थानकांच्या जवळ आहेत आणि बहुतेक हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स मुंबई उपनगर आणि त्याच्या आसपासच्या भागात राहतात. या अनुषंगाने लाभार्थी या केंद्रांमध्ये जाणे पसंत करतात आणि लस टोचून घेतात.
6 फेब्रुवारीपर्यंत एवढ्या जणांनी घेतली लस
केईएम - 9783
बीडीबीए -10694
राजावाडी - 10695
नायर - 9600
कूपर - 7382
बीकेसी जंबो - 8085
सायन -4799
वांद्रे भाभा - 4240
व्हीएन. देसाई - 1398
जेजे - 597
सेव्हन हिल्स - 3094
दहिसर जंबो - 511
एम. डब्ल्यू. देसाई - 132
भगवती - 188
व्ही डी सावरकर - 163
नेस्को - 2575
मॉ- 402
गोवंडी शताब्दी - 425
कस्तुरबा - 213
एसके पाटील - 370
बीएआरसी- 405
---------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
10 thousand healthcare workers vaccinated bmc Most vaccinations Rajawadi
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.