पनवेल महानगरपालिका खडबडून जागे झाले असून कळंबोली मॅकडोनाल्डला कोरोनाविषाणू बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
नवीन पनवेल : 14 परिसरात कोरोना संसर्ग(panvel corona update) मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या(mumbai-pune expressway) लगत असलेल्या कळंबोली मॅकडोनाल्डला (kalamboli macdonald )कोरोना विषाणु ची बाधा झाली आहे. या ठिकाणी दहा कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह(10 workers positive) आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे हा परिसर कंटेनमेंट म्हणून महापालिकेने घोषित करून मॅक्डोनाल्ड हॉटेल सील केले आहे. या परिसरात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.(10 workers are corona positive in kalmaboli macdonalds)
पनवेल परिसरात ही तिसरी लाटेत दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे. पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार असल्याने येथून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे. त्याचबरोबर नोकरी-व्यवसायानिमित्त अनेक जण मुंबई उपनगरात जातात. कळंबोली येथून मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग सुरू होतो. त्या ठिकाणीच मॅकडोनाल्ड हॉटेल आहे. त्यामुळे मुंबई पुण्याकडून ये-जा करणारे अनेक जण या ठिकाणी अल्पोपहार यासाठी थांबतात. विशेष करून विकेंडला मॅक्डोनल्ड मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ग्राहकांची संख्या इतकी मोठी असते तिच्या ठिकाणी पाय ठेवण्यासाठी सुद्धा कधीकधी जागा शिल्लक राहत नाही.
त्यामुळे सामाजिक अंधाराचा सातत्याने फज्जा उडतो. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पनवेल महानगरपालिकेकडून सामाजिक अंतर पाळले गेले नसल्याने कोणतीही कारवाई आत्तापर्यंत करण्यात आली नाही. या दुर्लक्षित पणामुळे कळंबोली मॅकडोनाल्ड मध्ये कोरोनाविषाणू चे संक्रमण झाले आहे. एकूण 10 जणांचे कोविड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुढे आली आहे . त्यानंतर पनवेल महानगरपालिका खडबडून जागे झाले असून कळंबोली मॅकडोनाल्डला कोरोनाविषाणू बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. हे हॉटेल सील करण्यात आले असून याठिकाणी अन्नपदार्थ विक्री बंद करण्यात आले आहे. त्या आशयाचा फलक पनवेल महानगरपालिकेकडून(panvel carporation) लावण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काही दिवस मॅक्डोनाल्ड बंद राहणार आहे. ज्याप्रमाणे सोसायट्यांना नियम लागू करण्यात आले आहे. तेच कंटेनमेंट चे नियम या हॉटेलला लागू राहणार आहेत
मॅक्डोनाल्ड कोरोनाचे संक्रमक !
मॅकडोनाल्ड(macdonalds) हॉटेलमध्ये हजारो जण अल्पोपहार करण्यासाठी येतात. त्याचबरोबर येथून पार्सल सुद्धा नेले जाते. मुंबई-पुण्याकडे(mumbai pune travel) येणारे जाणारे अनेक उच्चभ्रू आणि धनदांडगे प्रवासी या ठिकाणी थांबतात. मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाविषाणू (corona virus)चे एक प्रकारे संक्रमण केले जाते. मॅकडोनाल्ड मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे येथे आलेल्या अनेकांना कोरोना ची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट ड्रेसिंग करणे अत्यंत अवघड होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.