Mumbai Corona Update sakal
मुंबई

Mumbai Corona Update: कामा रुग्णालयात महिला कोविड वाॅर्ड

१०० खाटांची सुविधा; कोरोनाग्रस्त गर्भवतींसाठी विशेष खबरदारी

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Corona Update - सीएसएमटी परिसरात असलेल्या राज्य सरकारच्या कामा व आल्बेस रुग्णालयात महिला रुग्णांसाठी १०० खाटांची क्षमता असलेला कोविड कक्ष सुरू करण्यात आला आहे.  कोविड गर्भवती आणि इतर महिला रुग्णांवरील उपचारांसाठी नवा कक्ष सज्ज राहणार आहे. गर्भवतींची विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.

पूर्वी कामा रुग्णालय मॅटर्नल रेफरल केंद्र होते. आताही तशी सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच, पालिका रुग्णालयात आलेल्या कोविड गर्भवती महिलेला पुढील उपचारांसाठी कामा रुग्णालयात पाठवता येऊ शकते.

कामा रुग्णालयात संपूर्ण मुंबईसह इतर जिल्ह्यातूनही महिला उपचारांसाठी दाखल होतात. त्यात आता गर्भवती महिलांनाही कोविडचा संसर्ग होत असल्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, सध्या एका गर्भवती महिला कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

वैद्यकीय शिक्षण व  संशोधन आयुक्तांनी सर्व रुग्णालयांच्या प्रमुखांची कोविडसंदर्भात बैठक घेतली होती. बैठकीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कामा रुग्णालयात गर्भवती महिलांसह बालकांवरही उपचार होतात. जन्माला येणाऱ्या बाळासाठीही पिडिॲट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट (पीआयसीयू) सज्ज ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे जन्माला आलेल्या बालकास कोविडची बाधा झाल्यास विशेष कक्षात त्याच्यावर उपचार केले जातील, असे कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.

सध्या राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये बूस्टर डोस देण्यात येत असले तरी त्यात कोविशिल्डचा तुटवडा असल्याचे दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे कोव्हॅक्सिनचा साठा पुरेसा असल्याने डॉक्टरांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. (Latest Marathi News)

  • आयसीयू बेड्स ८

  • व्हेंटिलेटर  ३

  • पीआयसीयू ७

  • एकूण कर्मचारी १६

  • आरोग्य अधिकारी ३

सर्व औषधांची उपलब्धता,आरटीपीसीआर चाचणी

एचडीयू सुविधा ,एनआयसीयू सुविधा

आपत्कालीन सुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT