11th admission esakal
मुंबई

Admission: अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी उद्या अखेरची संधी, महाविद्यालये संकटात?

CD

मुंबई, ता. २४ : मुंबई महानगरसह राज्यातील पाच महापालिका क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी उद्या (ता. २५) अखेरची संधी आहे. त्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षात कोणतीही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार नाही, असे आज शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.


गेल्या चार महिन्यांपासून अकरावीच्या प्रवेशासाठी मुख्य तीन प्रवेश फेऱ्या राबविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्याने रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने सात विशेष फेऱ्या आणि २३ ऑक्टोबरपासून दैनंदिन फेऱ्या राबवल्या होत्या. त्याची अखेरची मुदत २५ ऑक्टोबर असून त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अकरावीच्या रिक्त राहिलेल्या जागांसंदर्भात प्रवेश प्रक्रिया केली जाणार नाही, असे संचालक सूर्यवंशी यांनी सांगितले.

२३ ऑक्टोबरपासून दैनंदिन गुणवत्ता फेरी दैनिक गुणवत्तेवर आधारित राबविण्यात आली होती. त्यात दररोज निवडलेल्या आणि प्रतीक्षाधीन विद्यार्थ्यांची यादी दररोज सकाळी दहा वाजता घोषित केली जात होती. प्रवेश न मिळालेले विद्यार्थी सायंकाळी सात ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत अर्ज करू शकत होते. इतक्या वेगळ्या प्रकारची मुभा देऊही मुंबई विभागामध्ये केवळ हजारांवर विद्यार्थ्यांनीदेखील आपले प्रवेश निश्चित केले नाहीत. त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रकारची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार नाही याची खबरदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले आहे.

महाविद्यालये संकटात?
मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तब्बल चार महिने चाललेल्या प्रवेश प्रक्रियेनंतरही ९० हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. मुंबईतील काही ठराविक महाविद्यालयांमध्ये मात्र सर्वाधिक जागा भरल्या असून गेल्या काही वर्षांत नव्याने मान्यता मिळालेली अनेक महाविद्यालये प्रवेश न होऊ शकल्याने संकटात सापडल्याचे चित्र प्रवेश प्रक्रियेतून समोर आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT