मुंबई : फुफ्फूसाच्या कर्करोग शेवटच्या टप्प्यात समजत असल्याने उपचार करणे अवघड होते. मुंबईत कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूपैकी फुफ्फूसाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरात दिवसाला सरासरी दोन जणांचा मृत्यू फुफ्फूसाच्या कर्करोगाने मृत्यू होतो.
मुंबईत 2014 मध्ये फुफ्फूसाच्या कर्करोगाने 831 जणांचा मृत्यू झाला. तर, 2015 मध्ये 682 जणांचा मृत्यू झाला. 2015 मध्ये कर्करोगाने मृत्यू होणाऱ्या पैकी 12.8 टक्के जणांचा फुफ्फूसाच्या कर्करोगाने बळी घेतला होता. तर, 2014 मध्ये हे प्रमाण 13.9 टक्के होते. तर, 2018 मध्ये संपुर्ण देशात 45 हजार 363 जणांचा मृत्यू झाला होता.
महत्त्वाची बातमी: बाप कुठं मेला, ज्यांना माहित नाही त्यांच्याकडे नागरिकत्वाचे कागदपत्रं मागताय? - प्रकाश आंबेडकर
साधारणत: कर्करोग हा पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात लक्षात आल्यास त्यावर यशस्वी उपचार केले जातात. मात्र, फुफ्फूसाचा कर्करोग हा तीसऱ्या आणि चौथ्या टप्यात लक्षात येतो. त्यामुळे उपचार करणे अवघड होते. तसेच, फफ्फूसाच्या कर्करोगावरील उपचारही महाग असतात त्यामुळे तुलनेने मृत्यूची संख्या अधिक असते. असे कर्करोग तज्ज्ञ डॉ.विनय देशमाने यांनी सांगितले.
महत्त्वाची बातमी: फ्लॅट दाखवण्याच्या नावाने अमृता घेऊन जायची आणि ..
फूफ्फूसाच्या कर्करोगाची आणि क्षयाच्या आजाराची लक्षणही प्रामुख्याने एकसारखी असतात. त्यातच,एक्स रे किंवा सिटीस्कॅनमध्येही पहिल्या टप्प्यात कर्करोग लक्षात येत नाही. त्यामुळे सुरवातील क्षय तसेच इतर आजाराचे उपचार होण्याचे प्रकार जास्त आहेत.त्यामुळे फफ्फूसाच्या कर्करोगाचे बळी जास्त असण्याची शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त केली जाते.
महत्त्वाची बातमी: पुतीन यांच्या जिवाला धोका, ट्रम्प होणार बहिरे; बाबा वन्गाची भारताबाबत भविष्यवाणी काय?
फुफ्फूसाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी बायास्पी हा सर्वात प्रभावी पर्याय मानला जातो. त्यात फुफ्फूसाच्या पेशी काढून त्याची तपासणी केली जाते.मात्र, वजन कमी होणे,श्वास घेताना त्रास होणे, खोकल्यातून रक्त येणे, वारंवार खोकला येणे अशी प्राथमिक लक्षणं असतात. पण, ही लक्षणे क्षयाच्या आजारातही आढळून येतात. त्यामुळे प्राथमिक स्तरावर उपचार करताना अनेक वेळा क्षयाचे उपचार केले जातात.
Webtitle : 124 people in india and 2 in mumbai lost their life due to lung cancer
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.