मुंबई

P-305 जहाज बुडालं, १४ मृतदेह आणले मुंबईत

'तौक्ते' चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलं होतं जहाज

दीनानाथ परब

मुंबई: दोन दिवसांपूर्वी 'तौक्ते' चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून P-305 (barge P-305) हे जहाज अरबी समुद्रात बुडाले. मुंबईपासून ३५ नॉटिकल माइल्स अंतरावर ही दुर्घटना घडली. P-305 जहाजाबद्दल माहिती मिळाल्यानंतर नौदलाने आपल्या विशेष युद्धनौका रवाना केल्या व मोठी बचाव मोहिम राबवली. नौदलाने (indian navy) P-305 जहाजावरील १८५ लोकांची सुटका केली. पण अजूनही काही जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. नौदलाला आतापर्यंत १४ मृतदेह हाती लागले असून ते सर्व मृतदेह मुंबई डॉकयार्डमध्ये आणण्यात आले आहेत. (14 bodies brought back to Mumbai two days after barge P-305 sank due to Cylone Tauktae)

आतापर्यंत १४ मृतदेह हाती लागल्याच्या वृत्ताला पश्चिम नौदल कमांडचे कमांडर ऑपरेशन्स एम.के.झा यांनी दुजोरा दिला आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. P-305 जहाजावरीलच हे सर्व मृतदेह आहेत का? हे अजून स्पष्ट झालेले नाही. P-305 वरील ८९ जण अजून बेपत्ता आहेत. सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. नौदलाचे जवान अत्यंत प्रतिकुल वातावरणाशी सामना करत आहेत, असे नौदलाकडून सांगण्यात आले.

P-305 वरील २७३ पैकी १८४ जणांची सुटका करण्यात आली आहे. शोध आणि बचाव मोहिम सुरु आहे. आम्ही त्यांना किनाऱ्यावर आणण्याची आशा अजून सोडलेली नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नौदलाचे आयएनएस कोची जहाज P305 वरुन सुटका केलेल्या १८४ जणांपैकी १२५ जणांना घेऊन बुधवारी मुंबई बंदरात दाखल झाले. "बुधवार सकाळपर्यंत P305 वरील १८४ जणांची सुटका करण्यात आली असून INS तेग, INS बेतवा, INS बीआस, P8आय विमान, सी किंग हेलिकॉप्टरकडून शोध आणि बचाव मोहिम सुरु आहे" असे नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT