मुंबई

पश्चिम रेल्वे मार्गावर तेजस एक्स्प्रेससह 15 ट्रेन धावणार; तिकीट बुकिंग 11 ऑक्टोबर पासून सुरू

प्रशांत कांबळे

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील अनलॉक नंतर आता रेल्वे हळूहळू रुळावर येतांना दिसत आहे. यामध्ये मध्य रेल्वे ने नुकतेच अनेक मार्गावर आपल्या विशेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता, पश्चिम रेल्वे मार्गावर सुद्धा तेजस एक्स्प्रेस सह 15 विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये ट्रेन नंबर 09003/09004 आणि 09047 या गाड्यांची तिकीट बुकिंग 11 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेन नंबर 02961/02962, 02945/02946, 09305, 09209 आणि 09075 या ट्रेनसाठी 12 ऑक्टोबर, ट्रेन नंबर 02971/02972 साठी 13 ऑक्टोबर, ट्रेन नंबर 09063, 09147 आणि 09021 यासाठी 14 ऑक्टोबर, ट्रेन संख्या 02941, 09111 आणि 09103 यासाठी 15 ऑक्टोबर रोजी तिकीट विक्री पीआरएस खिडकी आणि आयआरसिटीसी वेबसाइटवर सुरू करण्यात येणार आहे. तर तेजस एक्सप्रेससाठी तिकीट बुकिंग फक्त आयआरसीटीसी वेबसाईट आणि आयआरसिटीसी तात्काळ आरक्षण ऑनलाइन मिळवता येणार आहे.

02961/02962 मुंबई सेंट्रल-इंदौर सुपरफास्ट विशेष अवंतिका एक्सप्रेस (दैनंदिन)
02961 मुंबई सेंट्रल-इंदौर विशेष ट्रेन 15 ऑक्टोबर पासून मुंबई सेंट्रल स्थानकावरून 7.10 सुटणार तर दुसऱ्या दिवशी सकाळी 9.15 वाजता इंदोर येथे पोहचणार. त्याप्रमाणेच 
02962 इंदौर-मुंबई सेंट्रल विशेष ट्रेन 15 ऑक्टोबर रोजी इंदोर येथून दुपारी 4.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.10 वाजता मुंबई सेंट्रल स्थानकावर पोहचेल

02945/02946 मुंबई सेंट्रल-ओखा सुपरफास्ट विशेष सौराष्ट्र मेल (दैनंदिन)
02945 मुंबई सेंट्रल-ओखा विशेष ट्रेन 15 ऑक्टोबर पासून मुंबई सेंट्रल स्थानकावरून रात्री 9.35 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी दुपारी 3.35 वाजता ओखा पोहचणार, तर 02946 ओखा-मुंबई सेंट्रल विशेष ट्रेन 16 ऑक्टोबर रोजी ओखा येथून दुपारी 1.10 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7.10 वाजता मुंबई सेंट्रल पोहचेल. 
 
09075/09076 बांद्रा टर्मिनस-रामनगर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस (साप्ताहिक)
09075 बांद्रा टर्मिनस-रामनगर विशेष ट्रेन 15 ऑक्टोबर पासून रोजी वांद्रे टर्मिनस स्थानकावरून दर गुरुवार सकाळी 5.10 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता रामनगर पोहचणार. त्याप्रमाणेच, 
09076 रामनगर-बांद्रा टर्मिनस विशेष ट्रेन 16 ऑक्टोबर रोजी रामनगर स्थानकावरून दर शुक्रवार 4.30 वाजता सुटणार तर दुसऱ्या दिवशी 10 वाजता वांद्रे टर्मिनस पोहचणार 
 
09021/09022 बांद्रा टर्मिनस-लखनऊ सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस (साप्ताहिक)
09021 बांद्रा टर्मिनस-लखनऊ विशेष ट्रेन 17 ऑक्टोबर पासून वांद्रे टर्मिनस येथून दर शनिवारी दुपारी 12.55 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी रात्री 7.15 वाजता लखनऊ पोहचेल त्याप्रमाणेच
09022 लखनऊ-बांद्रा टर्मिनस विशेष ट्रेन 18 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथून दर रविवार रात्री 11.35 वाजता सुटणार तर मंगळवारी सकाळी 8 वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहचलेत. 

02971/02972 बांद्रा टर्मिनस - भावनगर सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक)
02971 बांद्रा टर्मिनस - भावनगर टर्मिनस स्पेशल 17 ऑक्टोबर पासून वांद्रे टर्मिनस येथून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार रात्री 9.30 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता भावनगर टर्मिनस पोहचणार, 02972 भावनगर टर्मिनस - वांद्रे टर्मिनस स्पेशल 16 ऑक्टोबर रोजी भावनगर टर्मिनस येथून प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवार रोजी रात्री 6.30 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8.35 वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहचेल 
 
09003/09004 बांद्रा टर्मिनस - भुज एसी स्पेशल एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक)
09003 बांद्रा टर्मिनस - भुज स्पेशल 16 ऑक्टोबर पासून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी वांद्रे टर्मिनस येथून रात्री 11.45 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी दुपारी 12.40 वाजता भुज पोहचणार त्याप्रमाणेच
09004 भुज - वांद्रे टर्मिनस स्पेशल ट्रेन 17 ऑक्टोबर पासून भुज येथून दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी 3.55 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी 5.15 वाजता पोहचणार 
 
09047/09048 बांद्रा टर्मिनस - एच. निजामुद्दीन स्पेशल युवा एक्सप्रेस (साप्ताहिक)
09047 बांद्रा टर्मिनस - एच. निजामुद्दीन स्पेशल 16 ऑक्टोबर पासून दर शुक्रवारी वांद्रे टर्मिनस येथून सायंकाळी 4.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.40 वाजता एच निजामुद्दीन येथे पोहचेल, त्याप्रमाणेच, 
09048 एच. निजामुद्दीन - वांद्रे टर्मिनस स्पेशल 17 ऑक्टोबर पासून एच. निजामुद्दीन येथून प्रत्येक शनिवार दुपारी 3.35 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी 9.20 वाजता वांद्रे टर्मिनस पोहचणार 

09111/09112 वलसाड-हरिद्वार सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस (साप्ताहिक)
09111 वलसाड-हरिद्वार विशेष ट्रेन 20 ऑक्टोबर पासून वलसाड येथून दर मंगळवारी दुपारी 3.40 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी दुपारी 4.15 वाजता हरिद्वार पोहचेल,
त्याप्रमाणेच
09112 हरिद्वार-वलसाड विशेष ट्रेन 21 ऑक्टोबर पासून हरिद्वार येथून दर बुधवारी सांयकाळी 6.30 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.20 वाजता वलसाड येथे पोहचेल 
 
09209/09210 वलसाड-पुरी सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस (साप्ताहिक)
09209 वलसाड-पुरी विशेष ट्रेन 15 ऑक्टोबर पासून, दर गुरुवारी रात्री 8.15 वाजता सुटेल आणि शनिवारी सकाळी 9.45 वाजता पुरी येथे पोहचेल. त्याप्रमाणेच 09210 पुरी-वलसाड विशेष ट्रेन 18 ऑक्टोबर पासून दर रविवारी सकाळी 6.30 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी 7.50 वाजता वलसाड पोहचणार
 
09147/09148 सूरत-भागलपुर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक)
09147 सूरत-भागलपुर विशेष ट्रेन 17 ऑक्टोबर पासून सूरत येथून दर मंगलवार आणि शनिवारी सकाळी 09.55 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी 7 वाजता भागलपूर पोहचणार त्याप्रमाणेच 09148 भागलपुर-सूरत विशेष ट्रेन 19 ऑक्टोबर पासून भागलपुर येथून दर मंगळवार आणि गुरुवारी सकाळी 09.25 वाजता सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.40 वाजता सुरत पोहचणार आहे.  
 
09063/09064 उधना-दानापुर विशेष एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक)
09063 उधना-दानापुर विशेष ट्रेन 17 ऑक्टोबर पासून उधना स्थानकावरून दर मंगळवार आणि शनिवारी सकाळी 08.20 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी  दुपारी 1.35 वाजता दानापूर स्थानकावर पोहचेल त्याप्रमाणेच 09064 दानापुर-उधना विशेष ट्रेन 18 ऑक्टोबर पासून दानापुर येथून दर बुधवार आणि रविवारी दुपारी 4.40 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी रात्री 10.45 वाजता उधना स्थानकावर पोहचणार  
 
09103/09104 वडोदरा-वाराणसी सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस (साप्ताहिक)
09103 वडोदरा-वाराणसी विशेष ट्रेन 21 ऑक्टोबर पासून वडोदरा स्थानकावरून दर बुधवारी रात्री 7 वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजता वाराणसी पोहचणार त्याप्रमाणेच 
09104 वाराणसी-वडोदरा विशेष ट्रेन 23 ऑक्टोबर पासून वाराणसी येथून दर शुक्रवारी सकाळी 6.15 वाजता  सुटेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी  09.30 वाजता वडोदरा येथे पोहचेल 
 
02941/02942 भावनगर - आसनसोल सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस (साप्ताहिक)
 02941 भावनगर टर्मिनस - आसनसोल स्पेशल 20 ऑक्टोबर पासून दर मंगळवारी भावनगर टर्मिनस येथून 5.30 वाजता सुटेल तर गुरुवारी सकाळी 10.25 येथे पोहचेल, त्याप्रमाणेच आसनसोल
 02942 आसनसोल - भावनगर टर्मिनस स्पेशल
22 ऑक्टोबर पासून दर गुरुवारी 7.45 वाजता आसनसोल येथून सुटेल आणि शनिवारी भावनगर टर्मिनस येथे सकाळी 11.10 येथे पोहचणार 

 09305/09306 डॉ. अम्बेडकर नगर - कामाख्या स्पेशल एक्सप्रेस (साप्ताहिक)
09305 डॉ.आंबेडकर नगर - कामाख्या स्पेशल 15 ऑक्टोबर पासून दर गुरुवारी दुपारी 12.45 वाजता सुटेल आणि शनिवारी दुपारी 1.45 वाजता कामाख्या पोहचेल त्याप्रमाणेच 
09306 कामाख्या - डॉ. आंबेडकर नगर स्पेशल 18 ऑक्टोबर पासून दर रविवारी सकाळी 5.35 वाजता  सुटणार आणि डॉ आंबेडकर नगर मंगळवारी सकाळी 06.05 वाजता पोहचणार 
 
82901/82902 मुंबई सेंट्रल - अहमदाबाद तेजस एक्सप्रेस (गुरुवार को छोड़कर)
82901 मुंबई सेंट्रल - अहमदाबाद तेजस एक्सप्रेस 17 ऑक्टोबर पासून मुंबई सेंट्रल येथून दुपारी 3.35 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 9.55 वाजता अहमदाबाद पोहचणार
त्याप्रमाणेच 82902 अहमदाबाद - मुंबई सेंट्रल तेजस एक्सप्रेस 17 ऑक्टोबर पासून अहमदाबाद येथील सकाळी  06.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1.10 वाजता मुंबई सेंट्रल पोहचणार

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT