154 metric tons of garbage on the beaches Mumbai Sakal
मुंबई

समुद्रकिनाऱ्यांवर १५४ मेट्रिक टन कचरा

घनकचरा विभागासमोर सफाईचे आव्हान

विकास खिलारी

मुंबई - मुंबईलगतच्या समुद्राला आलेल्या भरतीमुळे किनाऱ्यावर वाहून आलेल्या कचऱ्याने घनकचरा विभागाच्या डोक्याला चांगलाच ताप केला आहे. भरतीमुळे गेल्या दोन दिवसांत समुद्रकिनाऱ्यांवर तब्बल १५४ मेट्रिक टन कचरा जमा झाला. सर्व कचरा साफ करण्यात आला असला, तरी या कचऱ्याने घनकचरा विभागाच्या नाकी नऊ आणले.

मुंबईत पावसाने बऱ्यापैकी जोर धरला आहे. त्यातच समुद्राला भरती येऊन उंचच उंच लाटा उसळतात. शनिवारी आणि रविवार अरबी समुद्राला मोठी भरती आली. रविवारी आलेल्या भरतीमुळे समुद्रात ४.४६ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळल्या. या लाटांमुळे शनिवारी ९३.१८; तर रविवारी ६०.९४ मेट्रिक टन कचरा समुद्र किनाऱ्यावर फेकला गेला. यामुळे गेल्या दोन दिवसांत तब्बल १५४.१२ मेट्रिक टनाहून अधिक कचरा किनाऱ्यावर जमा झाला.

मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या दोन दिवसांत बधवार पार्क १८, दादर १५.१६, वर्सोवा ९२.६८, जुहू १५.४३, मढ ८.३५, गोराई ४.५१ मेट्रिक टन कचरा जमा झाला. गिरगाव चौपाटीवर मात्र कचरा वाहून आला नसल्याचे सांगण्यात आले. इतर ठिकाणी आलेल्या कचऱ्यामुळे चौपाट्यांवर कचऱ्याचा गालिचा तयार झाला होता. रविवारी रात्री उशिरापर्यंत हे कचरा उचलण्याचे काम सुरु होते, अशी माहिती उपायुक्त संगीता हसनाळे यांनी दिली.

पावसाळ्यात समुद्राला येणाऱ्या भरतीचे वेळापत्रक लक्षात घेऊन पालिकेच्या घनकचरा विभागाचे सफाई कामगार तैनात करण्यात आले. गेल्या दोन दिवसांत सुमारे १५४.१२ टनापेक्षा जास्त कचरा गोळा केला आहे. वाहून आलेला कचरा त्वरित उचलून किनारपट्ट्या स्वच्छ करण्यात येत असून पर्यटकांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे.

- महेश मालंडकर, घनकचरा विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

SCROLL FOR NEXT