मुंबई- परीक्षा केंद्रामध्ये कथितरित्या हस्तमैथून करणाऱ्या एका १६ वर्षीय मुलाविरोधात काशीमीरा पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. चार मार्च रोजी हा प्रकार घडला होता. महिला पर्यवेक्षकाला हा प्रकार दिसून आला. त्यानंतर महिलेने याची माहिती शाळा प्रशासनाला दिली. (16 year old boy after as he was allegedly found masturbating inside an examination centre fir police)
शाळा प्रशासनाने विद्यार्थ्याविरोधात कारवाई सुरु केली होती. पण, महिला पर्यवेक्षक यावर समाधानी नव्हती. महिलेने काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी याप्रकरणी मुलाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. बाल कल्याण समितीने याला परवानगी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे.
महिला पर्यवेक्षकाचे प्रतिनिधित्व करणारे वकील आशिष सिंह यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. सीसीटीव्हीमधून स्पष्ट आहे की मुलगा हस्तमैथून करत होता. त्यामुळे मुलाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्याला परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याचे समुपदेशन करण्यात आले आहे. आम्ही हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळत आहोत, अशी माहिती काशीमीरा पोलिस स्टेशनमधील वरिष्ट पीआय राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा प्रशासनाने सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना पुरवलं आहे. मुलाविरोधात ९ मार्च रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शाळा प्रशासनाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.