कल्याण-डोंबिवली पालिका  sakal
मुंबई

कल्याण डोंबिवली महापालिकेचा 1773 कोटींचा प्रशासकीय अर्थसंकल्प मंजुर

मागील वर्षाच्या अंदाजापेक्षा 73 कोटीने जास्त

सुजित गायकवाड

डोंबिवली: डोंबिवली महापालिकेचा 1773 कोटी जमेचा आणि 106 लक्ष शिल्लकीचा अर्थसंकल्प शुक्रवारी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सादर केला. मागीलवर्षी 1700 कोटींचा अर्थसंकल्प मंजुर करण्यात आला होता. गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रार्दुभाव असल्याने आरोग्य व्यवस्थेवर अर्थसंकल्पात भर देण्यात आला होता. यंदा मार्च महिन्यातच कोरोना रुग्णांची संख्या ही 0 झाली असल्याने आरोग्य सुविधांसोबत शहर स्वच्छता, शहराचे सौंदर्यीकरण, मुलभूत सुविधा यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत महापालिकेच्या महसुली उत्पन्नात 370 कोटी 44 लाखांची झालेली वाढ दिलासादायक असून यंदाही नागरिकांवर करवाढीचा कोणताही भार अर्थसंकल्पात टाकण्यात आलेला नाही. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत प्रशासकीय राजवट लागू असल्याने पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करीत मंजुरही केला.

कोविडची लाट ओसरल्यामुळे पालिका आयुक्तांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा आरोग्यभिमुखतेसह विकासकामांवर अधिक भर देणारा मांडण्यात आला आहे. 1773.56 कोटी जमा, 1773.50 कोटी खर्चाचा आणि 106 लक्ष शिल्लकेचा अर्थसंकल्प पालिका आयुक्तांनी शुक्रवारी सादर केला. यातून 1056.22 कोटी महसुली व 716.28 भांडवली खर्च करण्यात येणार आहे. दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कराचा बोजा आपल्यावर पडेल का याची भिती नागरिकांना असते मात्र यंदाच्या अर्थसंकल्पातही करवाढीचा कोणताही भार नागरिकांवर लादण्यात आलेला नाही. त्यामुळे यंदाही कल्याण डोंबिवलीकरांना कर वाढीतून दिलासा मिळाला आहे. गेल्यावर्षीपेक्षा महसुली उत्पन्नात देखील भरीव वाढ करण्यात महापालिकेला यश मिळालेले आहे. यापुढे जे लक्षांक ठेवले आहे, त्यासाठीची तरतूद वेगवेगळ्या निधीतून या अंदाजपत्रकात करण्यात ले आहे. त्यातून पुढील वर्षाच्या काळात नागरिकांना महापालिका व नागरिकांच्या सहभागातून दर्जेदार सुविधा देऊन हे शहर राहण्यासाठी एक उत्तम दर्जाचे शहर बनविण्याचा प्रयत्न केला जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

महसुली उत्पन्नात मालमत्ता करातून 375.06 कोटी, स्थानिक संस्था करातून 365.64 कोटी, विशेष अधिनियमाखाली वसुली 432. 19 कोटी, पाणीपट्टीतून 70.25 कोटी, महापालिका मालमत्ता उपयोगिता व सेवा करातून 90.77 कोटी तर संकीर्ण उत्पन्नातून 29.32 कोटी उत्पन्न मिळणे पालिकेला अपेक्षित आहे. तर भांडवली उत्पन्नात 15 वा वित्त आयोगातून 63 तर शासन अनुदानापोटी 319.27 कोटी अनुदान मिळणे अपेक्षित आहे.

- खर्चामध्ये बांधकाम, विद्युत व इतर खर्चासाठी सर्वाधिक म्हणजेच 138.89 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याखालोखाल पाणी पुरवठा, मलनिःसारण व जलनिःसारण साठी 134.65 कोटी, सार्वजनिक आरोग्यासाठी 120.86 कोटी, प्राथमिक शिक्षणासाठी 67.7 कोटी, परिवहन उपक्रमासाठी 40 कोटी तर महिला व बालकल्याण विभागासाठी 12.83 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

विशेष उपक्रम

  • - नविन क्रिडासंकुल, इनडोअर कबड्डी स्टेडीयम व सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलाचा कायापालट

  • - मे 2022 अखेरपर्यंत संपूर्ण पालिका क्षेत्रात एलईडी पथदिवे बसवून 8 कोटींची बचत

  • - उंबर्डे, निळजे व गौरीपाडा तलावांचे सुशोभिकरण

  • - नविन इमारतींवर 1 मेगा वॅट क्षमतेची सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणी

  • - नवीन 10 उद्याने विकसित होणार

  • - डोंबिवली येथे 100 मेट्रिक टन ओल्या पासून खत निर्मिती प्रकल्प डिसेंबर अखेरीस सुरु करण्याचा मानस

  • - प्राण्यांकरीता स्वतंत्र स्मशानभूमी

  • - सीबीएसई बोर्डाच्या 3 शाळा सुरु करण्याचा मानस

  • - बारावे जलशुद्धीकरण केंद्र येथे नव्याने सेंट्रीफ्युज सिस्टिम उभारणे जेणेकरुन वाया जाणाऱ्या पाण्याचा पुर्नवापर शक्य

  • - मोहने येथे नवीन बंधारा बांधणे, महापालिकेसाठी वाढीव पाण्याची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT