185 accidents on Mumbai-Pune Expressway in 11 months 83 deaths recorded mumbai esakal
मुंबई

Accident News : अकरा महिन्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १८५ अपघात

तर ६५ जीवघेण्या अपघातांमध्ये ८३ मृत्यूंची नोंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : परिवहन विभाग आणि महामार्ग पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गांवर रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विशेष मोहीम सुरू आहे. चालकांची जनजागृती आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तर अवजड वाहतूकदारांना लेन पाळण्याची शिस्त लावली जात असतानाही, मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरील रस्ते अपघात कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या ११ महिन्यात द्रुतगती महामार्गावर १८५ अपघात झाले असून, यावर्षात चिंताजनक म्हणजे एका उभरत्या राजकीय नेत्याला सुद्धा रस्ते अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.

महामार्ग पोलिसांच्या अपघातांच्या नोंदीनुसार गेल्यावर्षी एकूण १८८ अपघात झाले होते. त्यापैकी ६६ जीवघेण्या अपघातांमध्ये ८० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. यातुलनेत यावर्षी जीवघेण्या अपघातांची संख्या ४ टक्याने वाढले आहे. तर अपघातामध्ये कोणतीही इजा न झालेल्या किरकोळ अपघाताच्या संख्येतही १२ टक्याने घट झाल्याचे महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीवरून निष्पन्न होत आहे. मात्र, एकूण अपघात आणि जीवघेण्या अपघातांच्या संख्येत फार फरक दिसून येत नाही. महामार्ग पोलिसांकडून २४ तास कारवाईसाठी पहारा देऊनही बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांची संख्या द्रुतगती महामार्गावर असल्याने वर्षाअखेर अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

द्रुतगती महामार्ग वळणदार आणि चढत्या उतरत्या स्वरूपाचा आहे. त्याशिवाय अवजड वाहनांची नियमीत रांगा असल्याने खासगी वाहनांना वाहतुकीसाठी प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो आहे. यामध्ये अवजड वाहनांच्या लेनकटिंगमूळे अपघात होत असून, इतरही वाहतुक नियमांचे सर्रास उल्लघंन होत आहे. महामार्ग पोलीसांकडून वेळोवेळी अशा वाहनांवर कारवाई करूनही अपघातांची संख्येत अपेक्षीत घट होत नसल्याचे महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

दोन वर्षातील ११ महिन्याच्या अपघाताची तुलना

गेल्यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यात १८८ एकूण अपघात झाले होते. त्यामध्ये ६६ जीवघेण्या अपघातांमध्ये ८० लोकांचा मृत्यू झाला होता. तर ५१ गंभीर अपघातामध्ये १२७ लोकांना गंभीर जखमी झाले आहेत आणि १४ किरकोळ अपघातामध्ये १६ लोकांना किरकोळ जखमा झाल्या असून ५७ अपघातांमध्ये कोणतीही दुखापत झाली नसल्याची नोंद करण्यात आली आहे. यातुलणेत यावर्षी ११ महिन्यात १८५ एकूण अपघात झाले असून, ६५ जीवघेण्या अपघातांमध्ये ८३ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ४५ गंभीर अपघातांमध्ये १११ लोकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत तर २५ अपघातामध्ये ३३ लोकांना किरकोळ दुखापती झाल्या आहे. तर दुखापती न झालेले ५० अपघात झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT