मुंबई

Palghar News: निळमाती घाटात सापडले २ दिवसांचे नवजात बालक, परिसरात खळबळ

भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा

Mokhada News: मोखाडा तालुक्यातील मोखाडा  - त्र्यंबकेश्वर मार्गावरील निळमाती घाटात पुरुष जातीचे अर्भक सापडले आहे. या घटनेची माहिती मिळताच मोखाडा पोलीसांनी बालकास ताब्यात घेऊन, जव्हार च्या ऊपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

या बालकाची प्रकृती स्थिर असून अज्ञाता विरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप गिते यांनी दिली आहे.

मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोखाडा- त्र्यंबकेश्वर या राष्ट्रीय महामार्गावर, निळमाती घाटात रस्त्याच्या कडेला एका लाल रंगाच्या कपडा व त्याला लाल व पांढरे पटटे असलेल्या कपडयात गुडाळलेल्या स्थितीत एक पुरूष जातीचे बालक (अंदाजे वय 2 ते 4 दिवस) असल्याची खबर मिळाली.

सदर घटनेची खबर मिळताच मोखाडा पोलिसांनी तातडीने दखल घेत, या बालकाला ताब्यात घेऊन, जव्हार च्या ऊपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

आत्ता बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदीप गिते यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय चौधरी करत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT