dr homi bhabha state university mumbai sakal
मुंबई

Mumbai News : 'पीएम उषा' अंतर्गत डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाला २० कोटी रुपयांचा निधी

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात आर्टिफिशल इंटेलिजन्स, डाटा सायन्स फॉर डायव्हर्सिटी आदी अभ्यासक्रमाला मिळणार बळकटी.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीला प्रधान मंत्री उच्चतर शिक्षा अभियान योजना (PM-USHA) अंतर्गत मान्यता डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र राज्यातील पहिली  क्लस्टर युनिव्हर्सिटी आणि भारतातील दुसरी  क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणून ओळख निर्माण झालेल्या या विद्यापीठाला प्रधान मंत्री उच्चतर शिक्षा अभियान योजना (PM-USHA) अंतर्गत २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे विद्यापीठातील नवीन अभ्यासक्रम आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स, डाटा सायन्स फॉर डायव्हर्सिटी आदी अभ्यासक्रमाला मिळणार बळकटी मिळणार आहे.

'पीएम उषा' अंतर्गत मिळालेल्या निधीचा वापर नवीनतम तंत्रज्ञांवर आधारित अभ्यासक्रम राबविण्याकरिता केला जाणार आहे. ज्या मध्ये पदवी स्तरावर आर्टिफिशल इंटेलिजन्स, डाटा सायन्स फॉर डायव्हर्सिटी, एक्यूवीटी अँड इन्कलुसिन, सायबर सेक्युरीटी आणि ड्रोन  तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम, तसेच मानव्य विद्याशाखेमध्ये पदव्युत्तर स्तरावर क्लिनिकल अँड काऊंसेलिंग सायकॉलॉजी अशा अभ्यासक्रमांचा समावेश असेल.

या सोबतच अत्याधुनिक ई-ग्रंथालय सुविधा, अद्ययावत संशोधन केंद्र, विद्यार्थी कौशल्य विकास केंद्र, स्टार्टअप अँड इन्कुबेशन सेल व संगणीकृत समुपदेशन व मार्गदर्शन केंद्र हे देखील स्थापन केले जातील. विद्यापीठामध्ये अत्याधुनिक संशोधन सामुग्री व उपकरणे घेतली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कामत यांनी दिली.

या २० कोटी रुपये च्या मदतीमुळे विद्यापीठाला गुणवत्ता वाढवणे, प्रवेशाचा विस्तार करणे आणि समावेशनाला प्रोत्साहन देणे या उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. विद्यापीठाच्या घटक संस्था ९९ वर्षांपेक्षा जुन्या आहेत, यामध्ये  1920 मध्ये स्थापन झालेली विज्ञान संस्था तर १८३५ मध्ये स्थापन झालेले सर्वात जुने एल्फिन्स्टन कॉलेज यांचा समावेश होतो.

कॉमर्स आणि बँकिंग मधील विख्यात सिडनहॅम महाविद्यालाय तसेच टीचर ट्रेनिंग महाविद्यालय ही सुद्धा विद्यपीठाच्या घटक संस्था आहेत . युरोपातील विद्यापीठांसारखे वास्तू आणि ब्रिटिश गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांच्या काळात सर कावसाजी जहांगीर, सर इब्राम आणि सर मुलजी यांच्या उदार देणगीतून या संस्थेची रचना आहे.

डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीच्या सर्व घटक संस्था या सरकारी संस्था आहेत आणि मोखाडा, पालघरच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लोकांना शिक्षण देण्याचा त्यांचा उद्देश आहे. संस्थेला माजी विद्यार्थ्यांचा समृद्ध वारसा आहे, त्यापैकी प्रमुख आहेत.

डॉ. होमी भाभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमानय टिळक, धोंडो केशव कर्वे, दादाभाई नौरजी, महादो गोविंद रानडे, हॉकीपटू मेजर ध्यानचंद, दीपक पारेख, उदय कोटक, सिने स्टार. रुतिक रोशन, जुही चावला, विनोद मेहरा वगैरे. विद्यापीठाकडे अनेक पेटंट आणि शोधनिबंध आहेत आणि सेमिकंडक्टर रिसर्च आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात परदेशातील नामांकित विद्यापीठांशी जवळून काम करत आहे.

या निधीमुळे आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन प्रोग्रामिंग यांसारख्या भविष्यातील तंत्रज्ञानातील अद्वितीय शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच सामाजिक विज्ञान, वाणिज्य आणि बँकिंगमधील ट्रान्सडिसिप्लिनरी अभ्यासक्रम सुरू करत आहोत. आम्ही आमचे शासन, परीक्षा आणि मूल्यमापन प्रणाली पूर्णपणे डिजिटल डोमेनमध्ये बदलत आहोत जी जनरेशन झेड शिकणाऱ्यांची गरज असल्याचे डॉ. कामत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT