मुंबईः भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाऊंड येथील जिलानी इमारत दुर्घटनेत आता पर्यंत 41 जणांचा बळी गेला असून 25 जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या भीषण दुर्घटनेत दिड ते पंधरा वर्ष वयोगटातील एकूण 20 चिमुरड्यांचा हकनाक बळी गेला आहे. कुणाचे एक, कुणाचे दोन तर कुणाची तीन तीन मुले या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडली आहेत.आपल्या चिमुरड्यांचा मृतदेह पाहून नातेवाईक शोक व्यक्त करीत आहेत.
शबनम मोहम्मद अली शेख ( 12वर्ष )
हसनैन आरिफ शेख ( 3 वर्ष )
आरीफा मुर्तुजा खान ( ३ वर्ष )
जैद जाबीर अली शेख ( 5वर्ष )
जुनैद जबीर अली शेख ( दिड वर्ष )
मरियम शब्बीर कुरेशी ( 12 वर्ष )
पलकबानो मो. मुर्तुजा खान ( 5वर्ष )
फराह मो. मुर्तुजा खान ( 6 वर्ष )
शबाना जाबीर अली शेख ( 3वर्ष )
रिया खान ( 3 वर्ष )
फातिमा बब्बू सिराज शेख ( वय 2 वर्ष )
फुजेफा जुबेर कुरेशी ( वय 5 वर्ष )
आकसा मोहम्मद आबिद अंसारी ( 14 वर्ष )
मोहम्मद दानिश आदिल अंसारी ( 11 वर्ष )
फायजा जुबेर कुरेशी ( वय 5 वर्ष )
आयशा कुरेशी ( 7 वर्ष )
फातमा जुबेर कुरेशी ( 8 वर्ष )
अफसाना अंसारी ( 15 वर्ष )
असद शाहिद खान ( अडीच वर्ष )
निदा आरिफ शेख ( 8 वर्ष )
अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत . धोकादायक ठरविलेल्या या इमारतीत अनेक कामगार आणि मजूर परिवार आपल्या परिवारासह राहत होती. पैशानीची चणचण आणि कमी भाडे असल्याने या इमारतीत अनेक जण भाड्यानं राहत होती. मात्र हेच कमी भाडे आपल्या आणि आपल्या परिवाराची राख रांगोळी करेल असा विचार येथील रहिवाशांना आला नाही हेच मोठे दुर्दैव ठरले आहे.
--------------
(संपादनः पूजा विचारे)
20 Small child died in Bhiwandi building accident
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.