मुंबई : रेल्वे प्रवासादरम्यान स्टंट करणाऱ्या स्टंटबाजांमुळे इतर प्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण होतो. त्यामुळे या स्टंटबाजांना चाप लावण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. आतापर्यंत जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत मध्य रेल्वेने कारवाई करत तब्बल 449 स्टंटबाजांना पकडले आहे. या स्टंटबाजांकडून 1 लाख 71 हजार 750 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. तर, एका स्टंटबाजाची थेट रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
महत्त्वाची बातमी : मॅडम सुट्टे पैसे घ्या आणि पाचशेची नोट द्या ना...
कधी लोकल गर्दी तर कधी उगाच स्टंट बाजी करण्यासाठी मुंबई लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करण्याऱ्यामुळे इतर प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते. यापुढे लोकलमध्ये प्रवास करताना कोणी स्टंटबाजी केल्यास रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) त्यावर कडक कारवाई करणार आहे. प्रामख्याने हार्बर रेल्वे मार्गवरजीटीबी नगर ते चुनाभट्टी, चेंबूर, गोवंडी, वाशी तर मध्य रेल्वे मार्गावर कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, दिवा, घाटकोपर, कुर्ला, मुलुंड, ठाणे अशा उपनगरी लोकलमध्ये स्टंटबाजांची संख्या अधिक आहे .
लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, तसेच त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी RPF कडून नेहमीप्रयत्न केले जातात. प्रवाशांनीही लोकल प्रवासादरम्यान सजग राहणे आवश्यक आहे. तसेच घडलेल्या घटनेची माहिती तत्काळ RPF अथवा रेल्वे पोलिसांना दिली पाहिजे.
- के.के. अशरफ ,वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे
यामध्ये जानेवारी 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत मध्य रेल्वेने कारवाई करत तब्बल 339 स्टंटबाजांना पकडले आहे. कुर्ला 97 , वडाळा 67 , घाटकोपर 49, ठाणे 39 स्टंटबाजी करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. या स्टंटबाजांकडून 1 लाख 71 हजार 750 रुपयांचा दंड वसूल करून कुर्ला येथेस्टंटबाजी करणाऱ्याला तुरुंगात पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा : एक कप चहात घ्या मुंबईत 2 घरं
स्टंटबाज कोण असतात ?
उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने महाविद्यालयीन तरुण, तरुणी यांचा समावेश असतो. अनेकदा काही अल्पवयीन मुलेही असे स्टंट करताना दिसतात. कधी गर्दूले, फेरीवाले, दारुडे, नाशापाणी करुन प्रवास करणारे प्रवासी, 15 चे 30 वर्षे वयोगटातील मुलं-मुली आदी मंडळींचा स्टंटबाजांमध्ये प्रामुख्याने समावेश दिसतो.
हे आहेत स्टंटचे प्रकार
स्टंटचे प्रकार लोकल गाडीतून प्रवास करताना गाडीच्या दरवाजाजवळ उभे राहणे, दरवाजातील खांबाला एक हात पकडून दुसऱ्या हताने रुळाशेजारील वीजेच्या खांबांना स्पर्ष करणे. पाय घासून जाताना पायानेच अन्य प्रवाशाला स्पर्श करणे, फलाटावरील प्रवाशाला हाताने मारणे, चालत्या किंवा उभ्या असलेल्या काढीच्या छतावर उभे राहणे, रेल्वे रुळावर उभे राहून सेल्फी काढणे, रेल्वे रुळावर टीक टॉक व्हिडिओ बनविणे, गाडी स्थानकातउभी असताना उडी मारुन बाजूच्या गाडीत जाणे, समोरुन येणाऱ्या दुसऱ्या गाडीतील प्रवाशांवर हातातील वस्तू फेकणे, अशा प्रकारचे स्टंट करताना दिसतात.
महत्त्वाची बातमी : नवी मुंबईच्या माजी महापौरांनी केला ‘हा’ गौप्यस्फोट; संतापले नगरसेवक
स्थानक - कारवाई - दंड वसूल
WebTitle : in 2019 RPF police took action on youngsters for doing stunts on ventral railways
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.