मुंबई : मुंबईत 24 तास धोरणाची नियमावली शुक्रवारी (ता.24) जाहीर करण्यात आली. त्यानुसार रात्री दीड वाजल्यानंतर मद्याची विक्री केल्यास विक्रेत्याचा मद्य परवाना दोन वर्ष रद्द होणार आहे. तर, मॉल्सना त्यांची दालने 24 तास सुरु ठेवण्याची परवानगी गमवावी लागणार असल्याचे नियमावलीतच स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच बरोबर मॉलमधील मल्टिप्लेक्स रात्री 1 वाजेनंतर सुरु ठेवण्याबाबत कामगार विभागाकडून नियमावली तयार करण्यात येणार आहे.
मोठी बातमी मुंबई 'नाईट लाईफ'वर अमृता फडणवीस म्हणतात...
अबकारी विभागाच्या नियमानुसार बार रात्री 1.30 पर्यंत बंद होणे आवश्यक आहे. त्यानुसार 1.30 वाजल्यानंतर केवळ मद्य विक्री करता येणार नाही. त्यासाठी ग्राहकांकडून शेवटची ऑर्डर रात्री 1 वाजेपर्यंत घेता येणार आहे. तशी नोटीस दर्शनी ठिकाणी लावणेही बंधनकारक आहे.
मॉल्स आणि मिलवरील जमिनीवर असलेल्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 24 तास व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, भविष्यात या योजनेचा विस्तार रेल्वे स्थानके, विमानतळ, बिझनेस हबच्या परिसरातील उपहागृह सुरु ठेवण्याचा विचार करण्यात येईल.
त्यासाठी महापालिका आणि पोलिसांची समिती निर्णय घेईल. या धोरणासाठी महापालिकेने सहायक आयुक्त शरद उघडे यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. ते पोलिस, महापालिका आणि व्यवसायिक यांच्यात समन्वय साधणार आहेत. अबकारी विभागाच्या नियमानुसार रात्री 1.30 पर्यंत बार बंद होणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा खालापूरात चार फुटी मांडुळ
चौपाटी परिसरात फूड ट्रक
गिरगाव चौपाटी जुहू चौपाटीचा परिसर, वांद्रे-कुर्ला संकुल, वरळी सी-फेस, वांद्रे बॅन्डस्टॅंड, नरिमन पॉईंट, एनसीपीए जवळ तसेच गिरगाव चौपाटी जवळील मफतलाल बाथ येथे फूड ट्रक रात्री 20 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहे. एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त फुड ट्रकना परवानगी देण्यात येणार नाही. त्याच बरोबर त्यांनी परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेऊन वाहनतळाचेही नियोजन करावे. तसेच इतर नियमांचेही पालन करावे लागणार आहे.
हे वाचलेय का... कांद्याचे दर आजही चढेच, ही आहे कारणे...
...तर पोलिस आकारणार सुरक्षेचे पैसे
क्रिकेटच्या सामन्यांच्या वेळी पोलिस सुरक्षा पुरवल्याच्या मोबदल्यात संबंधितांकडून शुल्क वसुल केले जाते. त्याच धर्तीवर एखाद्या ठिकाणी मोठी गर्दी होणार असेल तर त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त पुरवल्यास संबंधितांना शुल्क भरावे लागणार आहे. त्याच बरोबर गरजेनुसार बेस्ट बसेसही सुरु ठेवण्यात येतील.
24 hours policy rules announced in Mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.