मुंबई

26\11 Attack: कसाबला ओळखणाऱ्या 'देविका'चा सरकारला विसर; अजूनही आश्वासनांची पूर्तता नाहीच

सकाळ डिजिटल टीम

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकावर निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. यात देविका रोटावन ही जखमी झाली होती. तेव्‍हा तिचे वय नऊ वर्षे होते. बेछूट गोळीबार करून अनेकांचा जीव घेणारा दहशतवादी अजमल कसाब याची ओळख पटवणारी या खटल्यातील देविका ही सर्वात लहान साक्षीदार होती.त्या वेळी तिला सरकारकडून अनेक आश्‍वासने देण्यात आली होती. ती पूर्ण न झाल्याने तिने निराशा व्‍यक्त केली आहे.

तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. वांद्रे येथील चेतना कॉलेजमध्ये कला शाखेची विद्यार्थिनी असलेली देविका ही नोकरीच्या शोधात आहे. सरकारने दिलेल्या तिला घराचे आश्‍वासन दिल्याबाबत आठवण करताना ते पूर्ण करण्याचे आवाहन तिने मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना केले आहे.

२६/११ दहशतवादी हल्ल्याला रविवारी १५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर देविका हिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पूर्वी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. सरकारने यापूर्वी काही प्रमाणात मदत केली; पण आश्वासनांची पूर्तता केली नाही. तिला घर देण्याचे आश्वासन देण्यात आलेले होते, असे तिचे म्हणणे आहे. मात्र, अद्याप ते आश्वासनच राहिले. सध्या देविका कुटुंबासोबत भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे. तिला भाडे भरणे कठीण जात आहे. तिचे वडील शारीरिक व्याधींनी ग्रस्त असून तिच्यावर अपंग भावाचीही जबाबदारी आहे. girl who identified Kasab for first time

आयुष्यातील संघर्ष

देविकाने २००६ मध्ये दीर्घ आजाराने तिची आई गमावली होती आणि २६/११ च्या हल्ल्यापूर्वी तिचे वडील सुका मेवा विकायचे. मात्र, देविकाचे वडील शारीरिक व्याधींनी ग्रस्त असल्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी त्यांचा व्यवसाय थांबला. तिला दोन भाऊ आहेत. एक त्याच्या कुटुंबासह पुण्यात राहतो, तर दुसऱ्याला पाठीच्या कण्यातील व्याधीमुळे अपंगत्व आले आहे. देविकाला २०१४ मध्ये क्षयरोग झाला होता.

१६० हून अधिक नागरिकांचा मृत्यू

२६/११ च्या हल्ल्यात १६० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. हा हल्ला रोखण्यासाठी १० हून अधिक जवानांनी बलिदान दिले होते. रविवारी या दहशतवादी घटनेला १५ वर्षे पूर्ण होत आहेत. दहशतवादी कसाबला फासावर नेण्यात देविका रोटवानचे मोठे योगदान होते.

आठवणी ताज्या

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेच्या आठवणी देविकाच्य मनात अजूनही ताज्या आहेत. या हल्ल्यात तिच्या उजव्या पायावर गोळी लागली. लोक आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले अनेक मृतदेह हे दृश्‍य आठवले तरी आजही अंगावर शहारा येत असल्याचे ती सांगते. देविका हिने तेव्‍हा दहशतवाद संपवण्यासाठी आयपीएस अधिकारी बनण्याचा संकल्प केला होता. पण, सध्या देविकाला आपल्या कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे नोकरी शोधावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT