Mumbai Police esakal
मुंबई

Mumbai : फॅशन डिझायनर लिफ्ट जवळ रडत होती; डिलिव्हरी बॉयनं घरापर्यंत सोडलं, मग..

शेखला पोलिसांचा फोन जाताच त्याला काहीतरी गडबड असल्याचा अंदाज आला आणि त्यानं..

सकाळ डिजिटल टीम

शेखला पोलिसांचा फोन जाताच त्याला काहीतरी गडबड असल्याचा अंदाज आला आणि त्यानं..

पश्चिम उपनगरातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) रविवारी रात्री 27 वर्षीय कुरिअर डिलिव्हरी बॉयला (Courier Delivery Boy) अटक केली. खार पोलीस ठाण्याच्या (Khar Police Station) हद्दीत गेल्या सहा दिवसांत घडलेली ही तिसरी घटना आहे.

शादाम आलम साकिब आलम शेख (Shadam Alam Shakib Alam Shaikh) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तो धारावीचा (Dharavi) रहिवासी असून कुरिअर कंपनीत काम करतो. पीडित 24 वर्षीय महिला असून ती फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेत आहे. खार पोलिस (Khar police) ठाण्याच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, शादाम शेख हा पीडिता ज्या इमारतीत राहते, त्या इमारतीत इतर रहिवाशांना सामान पोहोचवण्यासाठी गेला होता. इमारतीत प्रवेश करत असतानाच त्याला 24 वर्षीय महिला फोनवर बोलताना आणि रडताना दिसली. त्या महिलेला रडताना पाहून शेखनं परिस्थितीचा फायदा घेण्याचा विचार केला आणि तो तिच्यासोबत लिफ्टमध्ये चढला.

पीडित महिलेनं ज्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता, शेखनं तो फ्लॅट शोधून काढला. नंतर पार्सल देऊन निघताना त्यानं टिश्यू पेपरवर एक मेसेज आणि त्याचा फोन नंबर लिहिला. त्यानंतर शेखनं महिलेच्या घरात तो टिश्यू पेपर टाकला. त्या मेसेजमध्ये त्यानं महिलेला फोन करायलाही सांगितलं होतं. नंतर 24 वर्षीय महिलेनं तो मेसेज वाचला आणि घाबरल्यामुळं तिच्या पालकांना फोन केला, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिस उपायुक्त अनिल पारसकर (Deputy Commissioner of Police Anil Paraskar) म्हणाले, "ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. मात्र, पीडित महिला सायंकाळी पोलिस ठाण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला."

पीडित महिलेला मिळालेल्या फोन नंबरचा वापर करून पोलिसांनी आरोपीला फोन केला. शेखला पोलिसांचा फोन जाताच त्याला काहीतरी गडबड असल्याचा अंदाज आला आणि त्यानं पोलिसांना बिहारमध्ये असल्याचं सांगितलं. त्यानंतर शेखनं आपला मोबाईल बंद केला, असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. त्यानंतर आम्ही शेखला धारावीतून अटक केली, असंही पोलीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT