मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राज्य सरकारने परवानगी दिलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाच आपले ओळखपत्र दाखवून प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये बेकायदेशीरपणे प्रवास करण्याचे प्रकार घडत असल्याने, तपासणी मोहिम हाती घेतली आहे. त्यामध्ये 291 केसेस दाखल करण्यात आल्या आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात अनियमित प्रवास करणा-या प्रवाशांविरूद्ध तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. उत्तरेतून मुंबईला परतण्यासाठी अप गाड्यांमध्ये प्रवासी विना तिकीट आणि बनावट ओळखपत्र तयार करून प्रवास करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामूळे मुंबई विभागाच्या एका आठवड्याच्या मोहिमेदरम्यान तब्बल 291 प्रकरणे दाखल करून 3.82 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मोहीमे दरम्यान मुख्यत: लक्षात आलेल्या अनियमितता
---------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.